आळंदीत डंपरची दुचाकीला धडक; शाळेतून आजोबांसोबत घरी जाणाऱ्या चिमुकलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 06:45 PM2022-07-25T18:45:03+5:302022-07-25T18:45:15+5:30

डंपर तथा ट्रकने धडक देऊन अपघातात बळी जाण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना

A dumper collided with a bike in Alandi the death of a child who was going home from school with his grandfather | आळंदीत डंपरची दुचाकीला धडक; शाळेतून आजोबांसोबत घरी जाणाऱ्या चिमुकलीचा मृत्यू

आळंदीत डंपरची दुचाकीला धडक; शाळेतून आजोबांसोबत घरी जाणाऱ्या चिमुकलीचा मृत्यू

googlenewsNext

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी - देवाची (ता.खेड) येथे शाळेतून आपल्या आजोबांसोबत दुचाकीवरून घरी जाणाऱ्या वाहनाला भरधाव डंपरने धडक दिली. या अपघातात चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी (दि.२५) सकाळी साडेअकराच्या सुमारास वडगाव रस्त्यावरील गोशाळेसमोर घडली. तनिषा उर्फ परी विशाल थोरवे (वय ४ वर्षे राहणार चऱ्होली खुर्द, थोरवेवस्ती ता. खेड, जि. पुणे) असे अपघातात गंभीर दुखापत होऊन मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे. डंपर तथा ट्रकने धडक देऊन अपघातात बळी जाण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. सदरच्या घटनेने आळंदीसह चऱ्होली खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबतची माहिती अशी की, तनिषाला आळंदीतील प्रियदर्शनी शाळेतून तिचे आजोबा किसन एकनाथ थोरवे हे दुचाकीहून घरी घेऊन जात होते. दरम्यान वडगाव रस्त्यावरील गोशाळेसमोर दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव डंपरने जोरात धडक दिली. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने तनिषाला मोठी दुखापत होऊन मृत्यू झाला. तर तिचे आजोबा किसन थोरवे यांच्या डोक्याला, हाताला, पोटाला, कमरेला मार लागून ते जखमी झाले आहेत. अपघानानंतर ट्रक चालक घटनास्थळाहून पळून जात होता. मात्र स्थानिक तरुणांनी पाठलाग करून त्यास पकडले.

याप्रकरणी डंपर चालक संतोष जामिरुद्दीन माल (सध्या राहणार शिर्के कंपनीजवळ, हनुमानवाडी केळगाव ता. खेड जि. पुणे) याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची किसन एकनाथ थोरवे (वय ६५ रा. चऱ्होली खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान आरोपीला आळंदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: A dumper collided with a bike in Alandi the death of a child who was going home from school with his grandfather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.