शेतकरी लग्नसोहळ्याला गेला अन् इकडे 40 एकर ऊस जळून खाक झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 10:00 PM2022-11-06T22:00:01+5:302022-11-06T22:02:07+5:30

शितोळे वस्तीवरील लग्नसोहळा कार्यक्रम असल्याने अनेक ग्रामस्थ, शेतकरी या लग्नसोहळयास गेले होते. 

A farmer went to a wedding and burnt 40 acres of sugarcane here ranzangaon pune | शेतकरी लग्नसोहळ्याला गेला अन् इकडे 40 एकर ऊस जळून खाक झाला

शेतकरी लग्नसोहळ्याला गेला अन् इकडे 40 एकर ऊस जळून खाक झाला

googlenewsNext

रांजणगाव सांडस (पुणे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथे सुमारे ४० एकर ऊसाला अचानक आग ऊस उत्पादक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आग कशामुळे लागली कारण मात्र समजू शकले नाहीत. याबाबत  माहितीनुसार, रविवारी (दि. ६) दुपारी 12 ते 1 वाजताच्या आसपास गणेगाव दुमाला येथील अविनाश शितोळे गट नंबर 545 यांच्या उसाच्या शेताला आग लागली. शितोळे वस्तीवरील लग्नसोहळा कार्यक्रम असल्याने अनेक ग्रामस्थ, शेतकरी या लग्नसोहळयास गेले होते. 

दुपारच्या उन्हात आगीने रुद्र रूप धारण केल्याने परिसरातील दत्तात्रय शितोळे, रामराव गरुड, मानसिंग शितोळे, अमरसिंग शितोळे, दिलीप शितोळे पोपट गरुड, कोंडीबा गरुड, संतोष गरुड, किसन गरुड, अरुण गरुड, दीपक गरुड, ज्ञानदेव सांगळे, चंद्रकांत कुदळे, महादेव कुदळे, नाना कुदळे या शेतकऱ्यांच्या एकूण ४० एकर ऊस जळून मोठे नुकसान झाले आहे.

परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अचानक आग लागल्यामुळे नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केले. परंतु वाऱ्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असलेने आग पसरत गेली व ऊस जळाल्याने परिसरातील शेतकरी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना, शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना श्रीगोंदा दौंड शुगर यांनी या भागातील जळीत उसाचे तोडणी करून गाळप करण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले असून ऊस तोडणी करून घेऊन जाणार असल्याचे कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांना सांगितले आहे.

Web Title: A farmer went to a wedding and burnt 40 acres of sugarcane here ranzangaon pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.