बापाकडून स्वतःच्याच मुलीचा विनयभंग; पती - पत्नीमध्ये वाद, पायाने गळा दाबून पत्नीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 02:56 PM2023-09-01T14:56:29+5:302023-09-01T15:07:09+5:30
दुचाकीचे पेट्रोल तिच्या अंगावर टाकून जाळून मारतो, अशी धमकी देत पत्नीचा खून केला
वाघोली : घरात झालेल्या वादात पतीने पत्नीला जबर मारहाण करून तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जळून मारल्याची धमकी देत खून केल्याची घटना आव्हाळवाडी-माळवाडी येथे माहेर संस्थेजवळ घडली. याप्रकरणी पीडित पत्नीच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलिस ठाण्यात पॉस्को व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पती त्याच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत असल्याने पती-पत्नीत वाद झाला. यामध्ये याने पत्नीला जबर मारहाण करून पायाने गळा दाबला, तसेच दुचाकीचे पेट्रोल तिच्या अंगावर टाकून जाळून मारतो, अशी धमकी देत तिला मारून तिचा खून केला. यामुळे आव्हाळवाडी- माळवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक तपास लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे करीत आहेत.