आळंदीत पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 08:03 PM2022-10-12T20:03:41+5:302022-10-12T20:03:58+5:30

आळंदी शहरात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे

A fine of Rs 500 will be levied on those who waste water in Alanya | आळंदीत पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारला जाणार

आळंदीत पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारला जाणार

googlenewsNext

आळंदी : आळंदी शहरात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्यास पाचशे रुपये दंड आकाराला जाणार आहे. तसेच यावर आळा घालण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने नळजोड बंद करणेकामी फिरते पथक स्थापन केले असल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली आहे.     
              
आळंदी शहरात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. मात्र शहरात उपलब्ध पिण्याच्या पाण्याचा अपव्ययही सुरू आहे. अनेकजण पिण्याच्या पाण्याने रस्ते धुणे, गाड्या धुणे, पाण्याची टाकी भरुन वाहती सोडणे असे प्रकार निदर्शनास येत आहेत. याबाबत नगरपरिषद कार्यालयास वारंवार तक्रारीही प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने आळंदी नगरपरिषदेने पाणी अपव्ययाची गंभीर दखल घेत १० ऑक्टोबरपासुन पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांना प्रथम दर्शनी लेखी नोटीस व पुन्हा सापडलेस रक्कम पाचशे रुपये दंड वसूल केला जाणार आहे. शहरात नळजोड बंद करणेकामी फिरते पथक स्थापन केले आहे. 
                
दोन दिवसात शहरातील १४ नागरिकांना याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र सदर मालमत्ताधारक पुन्हा पाण्याचा अपव्यय करताना आढळलेस नळजोड बंद करणेची कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अपव्यय टाळावा असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.

Web Title: A fine of Rs 500 will be levied on those who waste water in Alanya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.