सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला शिवीगाळ करायला लावली; तरुणांच्या टोळक्याच संतापजनक कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 20:29 IST2025-04-12T20:28:35+5:302025-04-12T20:29:22+5:30

तरुणांच्या अशा कृत्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कृती याला डाग लागला जातोय

A foreign tourist who came to Sinhagad was made to abuse him An outraged act by a group of youths | सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला शिवीगाळ करायला लावली; तरुणांच्या टोळक्याच संतापजनक कृत्य

सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला शिवीगाळ करायला लावली; तरुणांच्या टोळक्याच संतापजनक कृत्य

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आणि पराक्रम साता समुद्रापार पोहोचलाय आणि त्यामुळेच महाराजांचे किल्ले पाहण्यासाठी परदेशातून नागरिक येत असतात. असच पुण्यातील सिंहगडावर आलेल्या एका परदेशी पर्यटकाला महाराष्ट्रातील तरुणांच्या टोळक्यानं चक्क शिवीगाळ करायला लावल्याचा एक संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. आणि सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर वर जोरदार व्हायरल होतोय. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेवर कलंक लावण्याचा प्रकार या तरुणांनी केलाय आणि त्यामुळे या तरुणांवर टीका सुद्धा केली जातेय.

 व्हिडिओमध्ये एक परदेशी पर्यटक सिंहगडावर आलाय. आपल्या मोबाईलच्या च्या माध्यमातनं तो शूटिंग करतोय. न्यूझीलंड  देशातून आलेला हा पर्यटक होता. आणि यावेळी ते पर्यटक कुठून आलेत? ते कसे आलेत? हा मूळ परिचय सोडून त्या तरुणांनी त्याला अश्लील भाषेत बोलायला सांगितलं. शिवीगाळ करायला सांगितली.

मराठी भाषा येत नसल्यानं आणि त्या शब्दांचा अर्थही माहित नसल्यानं केवळ त्या तरुणांच्या सांगण्यानुसार या परदेशी पर्यटकानं ते शब्द उच्चारले. मात्र शिवीगाळ करत असताना आपण काहीतरी चुकीचं बोलत आहोत. असं या पर्यटकाला वाटलं कारण ते बोलून झाल्यानंतर ते तरुण हसत होते. अतिथी देवो भव अशी आपली महाराष्ट्राची संस्कृती पण आपल्या तरुणांनी त्यांना महाराजांचा अनुभव सांगण्याऐवजी शिवीगाळ करायला लावल्याचा प्रकार याठिकाणी घडलाय.

इथे पुन्हा येणार नाही असं त्या पर्यटकानं व्हिडिओ मध्ये उल्लेख केलाय. महाराजांचे किल्ले सर करण्यासाठी इतर देशातनं येणाऱ्या पर्यटकांना अशा प्रकारची हीन दर्जाची वागणूक काही तरुण करताना दिसून येत आहेत. असच या व्हिडिओमधून दिसतंय. त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कृती याला डाग लागला जातोय. आणि त्यामुळेच यावर संतापही व्यक्त होतोय. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या तरुणांवर काही कारवाई होईल का? हे पाहणंही महत्वाचं असणार आहे.

Web Title: A foreign tourist who came to Sinhagad was made to abuse him An outraged act by a group of youths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.