चाळीस वर्षीय व्यक्तीने उचलले टोकाचे पाऊल; उरुळी कांचन मधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 20:47 IST2025-04-12T20:47:30+5:302025-04-12T20:47:47+5:30
चाळीस वर्षीय व्यक्ती माळी काम करतात

चाळीस वर्षीय व्यक्तीने उचलले टोकाचे पाऊल; उरुळी कांचन मधील घटना
उरुळी कांचन : उरुळी कांचन पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मौजे नायगाव ता. हवेली जिल्हा पुणे येथील एका चाळीस वर्षीय व्यक्तीने दिनांक (११) रोजी सायंकाळी पाचच्याव सुमारास नायगाव मार्गवस्ती येथे राहत्या घरात अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिवाजी बिबीशन कांबळे (वय ४०, रा. मार्गवस्ती, नायगाव, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी कांबळे हे माळी काम करतात. शिवाजी कांबळे यांची बहीण सखुबाई या शुक्रवारी (दिनांक ११) सायंकाळी पाचच्या सुमारास कामावरून घरी आल्या. तेव्हा त्यांचा भाऊ शिवाजी कांबळे हे घरात अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी ही माहिती त्यांचे वडील बिबीशन आप्पा कांबळे यांना दिली. शिवाजी कांबळे यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. बिबीशन कांबळे यांनी ही माहिती उरुळी कांचन पोलिसांना दिली.