चारचाकीची दुचाकीला धडक; युवकाचा जागीच मृत्यू, दौंडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 11:07 AM2024-05-13T11:07:21+5:302024-05-13T11:07:34+5:30

युवकाच्या मृत्यूने देवकरवाडी परिसरात शोककळा पसरली

A four-wheeler collides with a two wheeler Youth died on the spot incident in Daund | चारचाकीची दुचाकीला धडक; युवकाचा जागीच मृत्यू, दौंडमधील घटना

चारचाकीची दुचाकीला धडक; युवकाचा जागीच मृत्यू, दौंडमधील घटना

पाटेठाण: देवकरवाडी (ता.दौंड) येथे चारचाकी गाडीने पाठीमागून जाऊन दुचाकीला जोरदार धडक मारल्याने अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला असून रविवार (दि.१२) रोजी सांयकाळच्या सुमारास घटना घडली आहे. अपघातात गणेश नंदू देवकर (रा.देवकरवाडी, वय-२४) या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
          
रविवारी सांयकाळी गणेश देवकर हा युवक देवकरवाडी गावातून राहू- वाघोली रास्ता फाट्याच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना साई ट्रेज कंपनी नजीक ही घटना घडली. भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेने देवकरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. अधिक तपास यवत पोलीस करत आहेत.

Web Title: A four-wheeler collides with a two wheeler Youth died on the spot incident in Daund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.