दगडाने ठेचून मित्राने केली मित्राची निर्घृण हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 07:28 PM2023-01-21T19:28:25+5:302023-01-21T19:31:35+5:30

दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना...

A friend killed a friend by crushing him with a stone; Shocking incident in Pune | दगडाने ठेचून मित्राने केली मित्राची निर्घृण हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

दगडाने ठेचून मित्राने केली मित्राची निर्घृण हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

googlenewsNext

चाकण (पुणे) : किरकोळ कारणावरून मित्रानेच मित्राची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चाकण एमआयडीसीतील महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावच्या हद्दीतील दुकानासमोर गुरुवारी ( दि. १९) रात्री उशिरा हा प्रकार घडला. हत्या केल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या हल्लेखोरास महाळुंगे इंगळे पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे सुतावरून स्वर्ग गाठत शुक्रवारी रात्री उशिरा बेड्या ठोकल्या आहेत.

दीपक काशीराम राठोड (वय ३५, मूळ रा. वाशिम) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दीपक याची हत्या केल्याप्रकरणी त्याचा मित्र विठ्ठल मंगेश चव्हाण (वय २२, मूळ आंधबोरी, ता. किनवट, जि. नांदेड) यास अटक करण्यात आली. महाळुंगे पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार बाळकृष्ण पाटोळे यांनी याप्रकरणी महाळुंगे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक वृत्त असे की, दीपक व विठ्ठल हे दोघे गुरुवारी रात्री दारू पिऊन चायनीज गाडीवर जेवण करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्या दोघात किरकोळ कारणावरून टोकाचा वाद झाला. यावेळी त्यांच्यात झटापट झाल्याने विठ्ठल याने दीपक याच्या डोक्यात दगड घालून खून केला.

दीपक याचा खून केल्यानंतर गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या विठ्ठल यास महाळुंगे पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे गजाआड केले. दरम्यान, हल्लेखोर विठ्ठल यास खेड न्यायालयाने मंगळवार (दि. २४) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विवेक पाटील व पोलिस निरीक्षक किशोर पाटील याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A friend killed a friend by crushing him with a stone; Shocking incident in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.