पुण्यात पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तरुणावर वार करुन निर्घृण खून, गणेश पेठेतील घटना

By विवेक भुसे | Published: November 20, 2023 11:09 AM2023-11-20T11:09:22+5:302023-11-20T11:10:28+5:30

ही घटना गणेश पेठेतील बुरुड गल्लीमधील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली....

A gruesome murder by a gang in Pune due to previous enmity, incident in Ganesh Pethe | पुण्यात पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तरुणावर वार करुन निर्घृण खून, गणेश पेठेतील घटना

पुण्यात पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तरुणावर वार करुन निर्घृण खून, गणेश पेठेतील घटना

पुणे : जीव वाचविण्यासाठी तो इमारतीमध्ये शिरला. जिन्याने धावत पळत छतावर गेला. पण, पुढे जाण्यास जागाच नसल्याने तो हल्लेखोरांच्या हातात सापडला. त्यांनी त्याला संपविले. पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याचा निर्घुण खून केला. ही घटना गणेश पेठेतील बुरुड गल्लीमधील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

सिद्धार्थ नंदकुमार हादगे (वय २९, रा. बुरुड आळी, गणेश पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. फरासखाना पोलिसांनी हर्षल पवार व त्याच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हादगे याचे हर्षल पवार व त्याच्या साथीदाराशी किरकोळ वाद झाले होते. रात्री तो घराजवळ असताना हर्षल पवार व त्याचे साथीदार हे कोयते घेऊन आले. त्यांना पाहून सिद्धार्थ ओसवाल बिल्डिंगमध्ये शिरला. तो पळत पळत छतावर गेला. तेथे हल्लेखोरांनी त्याला गाठून कोयत्याने वार करुन त्याचा खून केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A gruesome murder by a gang in Pune due to previous enmity, incident in Ganesh Pethe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.