महिलेने दिली बॉम्बने कॅब उडवून देण्याची धमकी; कंपनीच्या कॅबची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी

By विवेक भुसे | Published: June 14, 2023 11:20 AM2023-06-14T11:20:56+5:302023-06-14T11:21:22+5:30

पतीला धडा शिकविण्यासाठी त्याच्या कंपनीच्या कॅब बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा ईमेल कंपनीच्या मेलवर पाठवला

A guava seller was killed for no reason to spread terror Shocking types of hair | महिलेने दिली बॉम्बने कॅब उडवून देण्याची धमकी; कंपनीच्या कॅबची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी

महिलेने दिली बॉम्बने कॅब उडवून देण्याची धमकी; कंपनीच्या कॅबची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी

googlenewsNext

पुणे : पतीने दुसरे लग्न केले. त्यातून घरात वाद विवाद सुरु झाले. पतीला धडा शिकविण्यासाठी त्याच्या कंपनीच्या बिगर मुस्लिम प्रवास करत असलेल्या कॅब बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा ईमेल महिलेने पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी फरहीन अलरुमान शेख (वय ३३, रा. कोंढवा) या महिलेला अटक केली आहे. याबाबत खराडी येथील ऑल स्टेट कंपनीच्या व्यवस्थापकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कंपनीत ११ जून रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता घडला.

याबाबतची माहिती अशी, ऑल स्टेट कंपनीमध्ये अलरुमान शेख (वय ३२) हे कामाला आहेत. त्यांनी दुसरे लग्न केले. त्यातून पती पत्नीमध्ये सतत वाद होत होते. अलरुमान याची नोकरी जाण्याच्या हेतूने तिने पतीचा मेल आय डी वापरुन फिर्यादीच्या कंपनीच्या मेलवर मेल पाठविला. त्यात कंपनीचे बिगर मुस्लिम प्रवास करत असलेल्या कॅब बॉम्बने उडविण्याची धमकी दिली होती. तसेच कंपनीचे ऑफिस व कॅब्ज उडविण्याची धमकी दिली. हा मेल पाहताच फिर्यादी यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने कंपनीच्या सर्व कॅबची बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून तपासणी केली. त्यात काहीही आढळून आले नाही. त्यानंतर शोध घेतला असता फरहीन हिने हा मेल केल्याचे उघड झाल्याने तिला पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे तपास करीत आहेत.

Web Title: A guava seller was killed for no reason to spread terror Shocking types of hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.