Video: पुण्यातील जांभुळवाडी तलावात अचानक आढळला लाखो माशांचा खच्च; मोठा घातपात असल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 06:27 PM2023-05-13T18:27:39+5:302023-05-13T18:33:21+5:30

तलाव शेजारी असलेल्या अनेक मोठ्या सोसायटीचे मैला पाणी तलावात सोडले जात असल्याने पाणी प्रदूषित होऊन जलचरांचा जीव धोक्यात

A hoard of millions of fish was suddenly found in Jambhulwadi Lake in Pune Chances of major casualties | Video: पुण्यातील जांभुळवाडी तलावात अचानक आढळला लाखो माशांचा खच्च; मोठा घातपात असल्याची शक्यता

Video: पुण्यातील जांभुळवाडी तलावात अचानक आढळला लाखो माशांचा खच्च; मोठा घातपात असल्याची शक्यता

googlenewsNext

कात्रज : दक्षिण पुण्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी तलावाच्या किनाऱ्यावर हजारो मृत माशांचा खच साठला होता, अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात मासे मृत्यू पावल्याने हा मोठा घातपात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात मासे कशामुळे मेली याचे कारण स्पष्ट झाले नाही.

सकाळी तलावाच्या किनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या माणसांना हे दृष्ट दिसले, बहुतांश जणांनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढून व्हायरल केले. त्यामुळे जांभुळवाडी, कात्रज या परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, ते दृष्य पाहण्यासाठी शेकडो लोकांची तलावाजवळ गर्दी झाली. छोट्या मासोळ्यांपासून ते तब्बल पंधरा-वीस किलो वजनाचे चार-साडेचार फुट लांबीचे मोठे मासे मरून पडले होते. त्यातील बहुतांश मृत माशांचा खच हा तलावाच्या काठावर साचला होता तर तलावात आठ दहा फुटांपर्यंत अनेक मृत मासे पाण्यावर तरंगलेले दिसत होते.

त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनीही भेट देऊन मासे कशामुळे मृत्यू झाला त्याबाबत चौकशी करण्याचे केवळ आश्वासन दिले. दुपारी मृत मास्यांचा खच हटविण्यासाठी सुरवात केली होती. मात्र इकडे माशांचा खच काढला जात होता व दुसरीकडे माशांचे तडफडून मरणाचे प्रकार रात्रीपर्यंत सुरुच होते.

प्रदुषणामुळ जलचर प्राण्यांचे आरोग्य धोक्यात

शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी या उद्देशाने या तलावाची निर्मिती केली गेली होती. परंतू वाढत्या शहरीकरणामुळे या परिसरात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. .आंबेगाव बुद्रुक,आंबेगाव खुर्द जांबुळवाडी रोडचा काही भाग नव्याने महापालिकेत समाविष्ट झाला आहे.त्यामुळे या भागात मोठ्या इमारती होऊन नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत.त्यामुळे या ठिकाणी शेती शिल्लक राहिली नाही. या भागातील वाढत्या लोकसंख्येमुळे तलावाचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तलाव शेजारी असलेल्या अनेक मोठ्या सोसायटीचे मैला पाणी तलावात सोडले जात असल्यामुळे तलावाचे पाणी प्रदूषित होत असून जलचर प्राण्याचा जीव धोक्यात आला आहे.

माशांना भूल देण्याचे प्रकार सर्रास

पाटबंधारे विभागाशी संपर्क केला ते म्हणाले की, गेल्या वर्षी देखील असा प्रकार घडला होता. येथील मच्छीमार मासे पकडण्याआधी माशांना भुल देण्यासाठी काही औषदी पावडर पाण्यात टाकतात त्याचे प्रमाण जास्त झाल्यामुळेही असा प्रकार घडू शकतो. याशिवाय मनपा प्रशासनाकडून मैला मिश्रीत पाणी या तलावात सोडले जात असल्याने प्रदुषण वाढले आहे. त्याचाही फटका माशांना व जलचर प्राण्यांना बसतो आहे.

मासे कोणत्या कारणाने मृत पावले हे पहावे लागेल

जांभूळवाडी तलावामध्ये मासे मृत होण्याची माहिती मिळाली आहे. मागेही अशाच प्रकारचे प्रकार घडला होता. ह्या झालेल्या प्रकाराची माहिती घेण्यात येईल. नेमके मासे कोणत्या कारणाने मृत पावले आहेत हे पहावे लागेल. विजय पाटील, कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग.

तळ्याच्या काठावर हजारो मासे मरून पडल्याचे दृष्य दिसले

माझ्या घरातील गॅलरीतून हा तलाव दिसतो आज सकाळी गॅलरीत आल्यावर तळ्याच्या काठावर हजारो मासे मरून पडल्याचे दृष्य दिसले. नेमके काय झाले ते पाहण्यासाठी आम्ही तिथे गेलो तर काठावर हजारो मासे मरुन पडलेले होते तर काठावर काही मासे पाण्यातून बाहेर काढावे तशी तडफड करत होते. मरून पडलेल्या प्रत्येक माशाचे तोंड उघडलेले होते. हल्ली तलावामध्ये प्रचंड प्रदुषण वाढले आहे. तलावाकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष असते. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो आज जलचर प्राण्यांच्या जिवावर बेतले. - आश्विनी चौरे, रहिवाशी, विघ्नहर्ता सोसायटी

Web Title: A hoard of millions of fish was suddenly found in Jambhulwadi Lake in Pune Chances of major casualties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.