Pune | भोंगवलीत ट्रॅक्टर वळवताना पलटी झाल्याने कामगाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 21:35 IST2023-04-03T21:32:08+5:302023-04-03T21:35:02+5:30
ट्रॅक्टरचा पुढील भाग पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत...

Pune | भोंगवलीत ट्रॅक्टर वळवताना पलटी झाल्याने कामगाराचा मृत्यू
नसरापूर (पुणे) : भोंगवली (ता.भोर) येथील म्हसोबा मंदिराजवळील पाणंद रस्त्यानजीक ट्रॅक्टर वळवताना पलटी झाल्याने त्यात जालिंदरसिंग गुलजार सिंग (वय २२, सध्या रा. भोंगवली) याचा ट्रॅक्टर अंगावर पडल्याने मृत्यू झाला.
त्याच्याकडून ट्रॅक्टर वळवत असताना ट्रॅक्टरवरील ताबा सुटून ओढ्यात पलटी झाला. आणि त्याच्या अंगावर ट्रॅक्टरचा पुढील भाग पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी ठेकेदार गणेश धोंडिबा दारवटकर यांनी घडलेल्या प्रकारानंतर पुढील उपचारासाठी जखमीस भोर येथे हलवण्यात आले होते.
रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टरांनी जालिंदरसिंग याला मृत घोषित केले. तपास पोलिस हवालदार चव्हाण हे करत आहेत.