सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी; वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाने केला आगळावेगळा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 10:54 AM2024-06-21T10:54:02+5:302024-06-21T10:58:04+5:30

शनिवार आणि रविवार या सुट्यांच्या दिवशी सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांचा ओढा वाढतो आहे....

A large crowd of tourists at Sinhagad; To prevent traffic congestion, the administration has tried various methods | सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी; वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाने केला आगळावेगळा प्रयोग

सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी; वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाने केला आगळावेगळा प्रयोग

धायरी (पुणे) : सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी पर्यटकांची संख्या वाढल्याने घाटात वाहतूक कोंडीचा अनुभव अनेक पर्यटकांनी घेतला. शनिवार आणि रविवार या सुट्यांच्या दिवशी सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांचा ओढा वाढतो आहे.

तसेच इतर सुटीच्या दिवशी सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. दरम्यान वाहतूक कोंडीची समस्याही भेडसावताना दिसते. सिंहगड घाटातील वाहतुकीचे नियोजन घेरा सिंहगड वनसंरक्षण समिती करते. मात्र आता सुरळीत वाहतूक करण्याबाबतच्या सूचना जिल्हा प्रशासनाने वन समितीला दिल्या असून सिंहगडावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांसाठी वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. गडावर जाणारी वाहने कोंढणपूर नाका येथे थांबविणार, त्याचवेळी गडावरील वाहन तळावरून वाहने खाली येतील. कोंढणपूर नाका येथून वाहने गडावर सोडल्यावर वाहन तळावरून एकही वाहन खाली येणार नाही, असा प्रयोग करण्यात येणार आहे.

‘रिफ्रेशिंग’ साठी तरुणाई सिंहगडावर...

आठवडाभरात शहरात ढगाळ हवा आणि पावसामुळे आल्दाददायक वातावरण निर्माण झाल्याने पुणेकरांना विकेंडला सिंहगडावर जाण्याचा मोह आवरला नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. ढगाळ हवा, पाऊस आणि धुक्याने सिंहगड पहाटेपासूनच झाकला गेला होता. त्यामुळे पर्यटकांसाठी ही सहल ‘रिफ्रेशिंग’ ठरली. रविवारी दुपारी गडावरील पार्किंग फुल झाल्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी काही वेळासाठी पायथ्याला पर्यटकांना प्रवेश बंद केला होता.

- सुट्यांच्या दिवशी पर्यटकांची गर्दी

- अपुरे रस्ते अन् वाहनांची संख्या अधिक

- वाहतूक पोलिस वाढविण्याची गरज

- खडकवासला चौपाटी परिसरात रस्त्याच्या बाजूलाच करतात वाहने पार्किंग

- सिंहगड परिसरात दरड कोसळण्याचा धोका

पर्यटकांची संख्या आणि घाटातील वाहनांच्या संख्येच्या प्रमाणात तसे वेळापत्रक तयार करणार आहे. या संदर्भात तातडीने त्याची अंमलबजावणी या शनिवारपासून करण्यात येणार आहे. त्यासाठी वन व्यवस्थापन समितीच्या स्तरावर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितास आवश्यक ते आदेश आणि सूचना देखील केल्या आहेत.

- दीपक पवार, सहायक उपवनसंरक्षक, वनविभाग

 

Web Title: A large crowd of tourists at Sinhagad; To prevent traffic congestion, the administration has tried various methods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.