विश्रांतवाडीतील डीआरडीओच्या आवारात बिबट्याचा वावर; परिसरात घबराट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 01:36 PM2022-08-25T13:36:07+5:302022-08-25T13:40:01+5:30

हा प्रकार संस्थेच्या आवारातील निरीक्षण मनोऱ्यावर असलेल्या जवानाच्या लक्षात आला...

A leopard roams the premises of DRDO in Vishrantwadi; Panic in the area | विश्रांतवाडीतील डीआरडीओच्या आवारात बिबट्याचा वावर; परिसरात घबराट

विश्रांतवाडीतील डीआरडीओच्या आवारात बिबट्याचा वावर; परिसरात घबराट

Next

पुणे : विश्रांतवाडीतील लष्कराच्या संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) आवारात बिबट्याचा वावर असल्याचे चित्रीकरणात आढळून आले. त्यानंतर परिसरात घबराट पसरली आहे. या आवारात मंगळवारी पहाटे बिबट्या शिरला. हा प्रकार संस्थेच्या आवारातील निरीक्षण मनोऱ्यावर असलेल्या जवानाच्या लक्षात आला. त्यानंतर या घटनेची माहिती त्वरित वनविभागाला कळविण्यात आली.

वनविभाग तसेच बावधन येथील रेस्क्यू संस्थेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या भागात कॅमेरे बसविण्यात आले आहेत. संस्थेच्या आवारात दाट झाडी असल्याने बिबट्याचा शोध घेण्यात अडचण निर्माण झाल्याचे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले. खेड आणि हवेली तालुक्यात बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे आळंदीपासून काही अंतरावर असलेल्या फूलगाव परिसरातून बिबट्या या परिसरात आल्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी मुंढव्यातील नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात बिबट्या शिरला होता.

...तर १९२६ वर करा काॅल

सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या आहेत, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. बिबट्या दिसल्यास त्वरित वनपरिक्षेत्र कार्यालय किंवा टोल फ्री (१९२६) क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

Web Title: A leopard roams the premises of DRDO in Vishrantwadi; Panic in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.