थोडी भीती..., थोडा आनंद..., अन् उत्सुकता; अवघ्या काही तासातच बारावीचा निकाल जाहीर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 10:59 AM2023-05-25T10:59:01+5:302023-05-25T10:59:09+5:30

विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी २ वाजता निकाल पाहता येणार

A little fear..., a little joy..., and curiosity; 12th result will be announced in just a few hours | थोडी भीती..., थोडा आनंद..., अन् उत्सुकता; अवघ्या काही तासातच बारावीचा निकाल जाहीर होणार

थोडी भीती..., थोडा आनंद..., अन् उत्सुकता; अवघ्या काही तासातच बारावीचा निकाल जाहीर होणार

googlenewsNext

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२५) दुपारी दाेन वाजल्यापासून ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व काेकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( १२ वी ) परीक्षा घेण्यात आल्या हाेत्या. राज्यातील ३ हजार १९५ परीक्षा केंद्रांवर सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. परीक्षेचा निकाल दुपारी २ वाजता जाहीर केल्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांना १. mahresult.nic.in २. https://hse.mahresults.org.in/ ३.http://hscresult.mkcl.org. या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील आणि त्याची प्रिंटही घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती मिळणार आहे. तर कनिष्ठ महाविद्यालयांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध करून देण्यात येईल.

गुण पडताळणीसाठी २६ मे पासून करा अर्ज

ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर बारावी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांतील गुणांची पडताळणी करता येणार आहे. उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने (http://verification.mhe hsc.ac.in) या संकेतस्थळावरून स्वत: तसेच कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची साेय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी,शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना बारावीची गुणपत्रिका व स्थलांतर प्रमाणपत्र त्यांच्या शाळा महाविद्यालयामार्फत ५ जून पासून दुपारी तीन नंतर वितरित करण्यात येतील.
गुण पडताळणीसाठी २६ मे ते ५ जून आणि छायांकित प्रतीसाठी २६ ते १४ जून या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासोबतच ऑनलाइन पद्धतीने डेबिट, क्रेडिट आणि यूपीआय आणि बँकिंगद्वारे शुल्क भरता येणार आहेत.

पुनर्मूल्यांकनासाठी छायाप्रत अनिवार्य

उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

पुर्नपरीक्षा, श्रेणी सुधारसाठी २९ जूनपासून अर्ज

जुलै-ऑगस्ट मध्ये हाेणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुर्नपरीक्षा देणारे विद्यार्थी आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी २९ मे पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत.

Web Title: A little fear..., a little joy..., and curiosity; 12th result will be announced in just a few hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.