Pune Rain Update: पुणेकरांनो यंदा भरपूर पाऊस; शंभर टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

By श्रीकिशन काळे | Published: June 2, 2024 02:56 PM2024-06-02T14:56:40+5:302024-06-02T14:58:06+5:30

जून-जुलै महिन्यात पावसाचा खंड पडेल आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होणार

A lot of rain this year Pune people Meteorological department predicts 100 percent rain | Pune Rain Update: पुणेकरांनो यंदा भरपूर पाऊस; शंभर टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

Pune Rain Update: पुणेकरांनो यंदा भरपूर पाऊस; शंभर टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

पुणे : राज्यामध्ये जून ते सप्टेंबर २०२४ दरम्यान सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, नाशिक, चंद्रपूर या भागात शंभर टक्के आणि उर्वरित भागात साधारणपणे ९५ ते ९८ टक्के पावसाचा अंदाज आहे. पुण्यात शंभर टक्के पावसाचे प्रमाण असेल, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी रविवारी (दि.२) दिला. जून-जुलै महिन्यात पावसाचा खंड पडेल आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी राज्यातील १५ स्टेशनवरील आकडेवारी नूसार किती पाऊस पडेल, याचा अंदाज दिला. साबळे म्हणाले, राज्यामध्ये यंदा काही भागात चांगला पाऊस असणार आहे आणि उर्वरित भागात शंभर टक्क्यांहून कमी पाऊस आहे. त्यामुळे राज्य सरकारने याविषयी उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी देखील कमी पावसाचे पिक घ्यावे, कमी पावसात येणाऱ्या पिकांचे वाण तयार करून त्याचा वापर करायला हवा. यंदा मे महिन्यात तापमान खूप वाढले होते, त्यामुळे त्याचा पावसावर परिणाम झालेला आहे. म्यानमार, पाकिस्तान, भारत, द. आशिया या भागात मार्च ते मे महिन्यातील तापमान प्रचंड होते.’’

कसा दिला जातो अंदाज !

राज्यामध्ये सरासरीच्या ९९ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. गेल्या ३० वर्षांची आकडेवारी या अंदाजासाठी वापरण्यात आली आहे.

या भागात पडणार खंड !

वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात धुळे, राहुरी, अकोला, पाडेगाव, शिंदेवाही, पुणे, कोल्हापूर येथे पावसात मोठे खंड राहण्याची शक्यता असून, दापोली, नागपूर, निफाड, सोलापूर, जळगाव व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस

सध्या कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड पडतील, असे हवामान राहणार आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील. जून-जुलै महिन्यात पाऊस ओढ देणार आहे.

Web Title: A lot of rain this year Pune people Meteorological department predicts 100 percent rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.