कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील २ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले
By नितीश गोवंडे | Updated: May 5, 2024 15:38 IST2024-05-05T15:38:13+5:302024-05-05T15:38:36+5:30
एक काळ्या रंगाच्या दुचाकीवर हेल्मेट घालून आलेल्या दोघांनी महिलेच्या जवळ येत मंगळसूत्र ओढून पळ काढला

कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील २ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले
पुणे : घरातील कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याप्रकरणी हेल्मेट घातलेल्या दोन दुचाकीस्वार चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरेखा राजाराम परांडे (४७, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा परांडे या शुक्रवारी (ता. ३) रात्री साडेआठच्या सुमारास घरासमोरील मोकळ्या जागेत कचरा टाकण्यासाठी गेल्या होत्या. कचरा टाकून परतत असताना, त्यांच्या ओळखीच्या सुजाता कानसरकर यांच्या दुकानासमोर त्या गप्पा मारत उभ्या होत्या. यावेळी एक काळ्या रंगाच्या दुचाकीवर हेल्मेट घालून आलेल्या दोघांनी परांडे यांच्या जवळ येत मंगळसूत्र ओढून पळ काढला. याप्रकरणाचा पुढील तपास विश्रांतवाडी पोलिस करत आहेत.