पुण्याच्या मार्केटयार्ड येथे एका हॉटेलच्या पोटमाळ्यावर भीषण आग; २ कामगारांचा मृत्यू, १ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 09:26 IST2023-06-13T09:26:24+5:302023-06-13T09:26:46+5:30
अग्निशमन दलाला तिघे जखमी अवस्थेत आढळून आले होते, परंतु त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आले.

पुण्याच्या मार्केटयार्ड येथे एका हॉटेलच्या पोटमाळ्यावर भीषण आग; २ कामगारांचा मृत्यू, १ जखमी
पुणे : पुण्यातील मार्केटयार्ड येथे मध्यरात्री एक वाजता भीषण आगीची घटना घडली आहे. गेट नंबर १ च्या हॉटेल रेवळ सिद्धि येथे आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीत २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री मध्यराञी एक वाजता मार्केटयार्ड गेट नंबर एक येथील हॉटेल रेवळ सिद्धि येथे आगीची घटना घडली. हॉटेलच्या आतमध्ये पोटमाळ्यावर कामगार झोपले होते. आग लागल्यानंतर त्यांना बाहेर येता आले नाही. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यावर आगीवर नियंञण मिळवण्यात आले. व त्यानंतर पोटमाळ्यावर झोपलेल्या 3 कामगारांना जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले. तोपर्यंत 2 कामगारांचा मृत्यू झाला होता. तर सध्या एकावर उपचार सुरू असल्याचे अग्निशमन दलाने सांगितले आहे.