वडगाव शेरी भागात एका सुपर मार्केटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 12:45 PM2024-09-21T12:45:33+5:302024-09-21T12:46:21+5:30

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर

A massive fire engulfed a super market in Vadgaon Sheri area; 8 vehicles of fire brigade reached the spot | वडगाव शेरी भागात एका सुपर मार्केटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल

वडगाव शेरी भागात एका सुपर मार्केटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल

पुणे : पुण्याच्या वडगाव शेरी भागातील मतेनगर येथे एका सुपर मार्केटला आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकुण ८ अग्निशमन वाहने दाखल झाली असून जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार  , मतेनगर येथे एका सुपर मार्केटला आग लागली आहे. एकुण पाच दुकानांना आग लागली असून पत्र्याची दुकाने आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाची ८ वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे जवानांनी सांगितले आहे.

 

Web Title: A massive fire engulfed a super market in Vadgaon Sheri area; 8 vehicles of fire brigade reached the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.