पुणे महापालिकेच्या मीटर रिडरला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले
By रोशन मोरे | Published: July 12, 2023 02:54 PM2023-07-12T14:54:29+5:302023-07-12T14:55:07+5:30
कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मंगळवारी चतु:श्रृंगी पाणीपुरवठा विभाग कार्यालयाच्या आवारात करण्यात आली
पुणे: पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील मीटर रिडर उमेश राजाराम कवठेकर (वय ५४) याला २५ हजाराची लाच घेताना अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मंगळवारी (दि.११) चतु:श्रृंगी पाणीपुरवठा विभाग कार्यालयाच्या आवारात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश कवठेकर याने एका बिल्डरच्या मिळकतीला पाणीपुरवठा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांच्याकरिता काम करणाऱ्या परवानाधारक प्लंबरककडून मागितली होती. त्याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कवठेकर याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. कवठेकर याने तपासात सांगितलेकी, आपल्या दोन वरिष्ठांसाठी लाचेतील प्रत्येकी दहा हजार रुपये असे वीस हजार रुपये घेतले आहे. आणि स्वत:साठी पाच हजार रुपये घेतले आहे.