Pune: कुरुळीत अल्पवयीन मुलीची छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 01:31 PM2024-06-24T13:31:59+5:302024-06-24T13:35:01+5:30
मांडवगण फराटा ( पुणे ) : घरातील छताच्या लोखंडी अँगलला शाळेच्या ड्रेसवरील ओढणीच्या साहाय्याने एका अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या ...
मांडवगण फराटा (पुणे) : घरातील छताच्या लोखंडी अँगलला शाळेच्या ड्रेसवरील ओढणीच्या साहाय्याने एका अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना कुरुळी (ता. शिरूर) येथे गुरुवार (दि. २०) रोजी दुपारच्या सुमारास उघड झाली असून वडील मदन निवृत्ती खिलारे (सध्या रा. कुरुळी, मूळ रा. खडकी सदार, ता. रिसोड, जि. वाशिम) यांनी मांडवगण फराटा दूरक्षेत्र येथे फिर्याद दिली आहे.
मांडवगण फराटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुळी येथे राहणाऱ्या मोनिका मदन खिलारे (वय १७) या शाळकरी मुलीने राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली आहे. वडील दुपारच्या सुमारास विळा आणण्यासाठी घरी आले असता मुलीने घराचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे सदर घटना उघडकीस आली. तिला उपचारासाठी शिरूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मयत घोषित केले. पोलिसांनी सदर घटनेत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जोतीराव गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अमोल गवळी हे करीत आहेत.