अल्पवयीन मुलीला टेरेसवर बोलावून बलात्कार; तरुणाला २० वर्षांची शिक्षा
By नम्रता फडणीस | Published: January 18, 2024 02:59 PM2024-01-18T14:59:49+5:302024-01-18T15:00:10+5:30
न्यायाधीशांनी आरोपीला २० वर्षांची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली
पुणे: आपले फोटो तुझ्या कुटुंबासह गावातील मुलांना दाखवेन अशी धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या तरुणाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी जाधव यांनी २० वर्षांची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची
शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास तीन महिने शिक्षेचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
विशाल शशिकांत पाटणे ( वय २५ रा.कन्हेरी ता. खंडाळा, जि .सातारा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर भा.द.वि कलाम ३७६, ५०६ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६ व ८ नुसार राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. साक्षीदार हा फिर्यादीच्या घराच्या शेजारी राहण्यास आहे. त्यांच्याकडे घोड़े असून, ते लग्नकार्यात आणि लग्नाच्या वरातीमध्ये घोडे नाचवतात. आरोपी हा त्यांचा मदतनीस म्हणून काम करतो. त्यावेळी आरोपी हा साक्षीदाराच्या चुलत्याच्या बंगल्याच्या टेरेसवर मुक्कामाला असायचा. आरोपीने पीडित मुलीला टेरेसवर भेटायला बोलावले आणि मुलीवर टेरेसवर बलात्कार केला. या गुन्हयाचा तपास पुणे ग्रामीण चे आर.एम साबळे यांनी केला. अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्ट्टी यांनी काम पाहिले. आरोपी हा २७ जून २०२१ पासून कारागृहात आहे. या केसमध्ये पुणे सेशन कोर्ट पैरवी अंमलदार एएसआय विद्याधर निचीत आणि जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी पृथ्वीराज ताटे होते.