लहान भावाची तक्रार करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर मोठ्या भावाकडून अत्याचार
By नितीश गोवंडे | Updated: November 29, 2023 16:45 IST2023-11-29T16:45:08+5:302023-11-29T16:45:50+5:30
१५ वर्षीय फिर्यादीवरून दोन भावांवर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लहान भावाची तक्रार करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर मोठ्या भावाकडून अत्याचार
पुणे : लहान भाऊ त्रास देत असल्याची तक्रार मोठ्या भावाकडे केली. मात्र मोठ्या भावानेच त्या अल्पवयीन मुलीला ओढत नेत तिच्यावर बलात्कार केला. तसेच ज्या वेळेस बोलवले च्या वेळेस यायचे, नाही आलीस तर तुझे काय करयाचे ते बघतो, तुम्ही कोणीच माझे काही वाकडे करू शकत नाही अशी धमकी देखील दिली. याप्रकरणी १५ वर्षीय पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून दोन भावांवर अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. किशोर परमेश्वर केदार (२३) आणि नकुल परमेश्वर केदार (२१, रा. हॅप्पी कॉलनी, लेन नं. ३, विनायक मित्र मंडळाजवळ, गोसावी वस्ती, कोथरूड) अशी आरोपींची नावे आसून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १५ वर्षीय तरुणी कोथरूड परिसरात राहते. ती दररोज क्लासला ये-जा करते. त्यावेळी क्लासच्या जवळ राहणारा नकुल केदार हा तिची वारंवार छेड काढून तिला त्रास देत हाेता. त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून पीडिता त्याचा मोठा भाऊ किशाेर केदार याच्याकडे तक्रार करण्यास गेली. त्यावेळी किशोर केदार याने तिला जबरदस्तीने ओढत नेत तिच्यावर बलात्कार केला आणि धमकी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेख या करत आहेत.