Pune: अल्पवयीन मुलाकडून रिक्षामध्ये मुलीचा विनयभंग, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Published: February 3, 2024 03:35 PM2024-02-03T15:35:35+5:302024-02-03T15:38:27+5:30
ही घटना १ फेब्रुवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास घडली आहे...
पुणे : शाळेतून घरी ने-आण करणाऱ्या रिक्षामध्ये अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ फेब्रुवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने सु च्या जागेवर आग होत असल्याची तक्रार आईकडे केली होती. त्यावेळी पीडित मुलीच्या आईने तिच्याकडे अधिक चौकशी केली असता रिक्षातून येताना एकाने मांडीवर बसवून अनैतिक वर्तन केल्याची माहिती दिली. पीडित मुलगी आणि आरोपी हे एकाच शाळेत शिकायला आहेत. शाळेतून येताना रिक्षात विनयभंग केल्याची तक्रार दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माळी करत आहेत.