Pune: जंगलात रिक्षा नेऊनअल्पवयीन मुलास लुटलेज; वानवडी परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 17:14 IST2024-02-19T17:13:47+5:302024-02-19T17:14:14+5:30
ही घटना १७ फेब्रुवारी रोजी सकाळी पाचच्या सुमारास वानवडी इंडस्ट्रियल एरिया मधील जंगलात घडली आहे....

Pune: जंगलात रिक्षा नेऊनअल्पवयीन मुलास लुटलेज; वानवडी परिसरातील घटना
पुणे : रिक्षाचालकाने साथीदाराच्या मदतीने अल्पवयीन प्रवाशाला लुटल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी एका १७ वर्षीय तरुणाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालक अक्षय व त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १७ फेब्रुवारी रोजी सकाळी पाचच्या सुमारास वानवडी इंडस्ट्रियल एरिया मधील जंगलात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण मुंढवा येथे घरी जाण्यासाठी गाडीतळ येथून आरोपी अक्षयच्या रिक्षामध्ये बसला. यावेळी रिक्षात याआधीच एक जण बसलेला होता. रिक्षा वानवडी इंडस्ट्रियल भागातील जंगलात आली असताना शेजारी बसलेल्या एकाने फिर्यादीचे तोंड दाबले आणि जबरदस्तीने हातातील चांदीचे ब्रेसलेट, मोबाईल आणि रोख रक्कम असा २० हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला. यानंतर त्याला तिथेच जंगलात सोडून आरोपींनी पळ काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहे.