Pune | महिन्याचा संसार अन् एका दिवसात घटस्फोट; वैचारिक मतभेदांमुळे घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 05:15 PM2023-03-09T17:15:05+5:302023-03-09T17:15:57+5:30

या प्रकरणात दोघे २५ महिन्यांपासून वेगळे राहत आहेत...

A month's marriage and a day's divorce; The decision was taken due to ideological differences | Pune | महिन्याचा संसार अन् एका दिवसात घटस्फोट; वैचारिक मतभेदांमुळे घेतला निर्णय

Pune | महिन्याचा संसार अन् एका दिवसात घटस्फोट; वैचारिक मतभेदांमुळे घेतला निर्णय

googlenewsNext

पुणे :लग्नानंतर दोघांनी अवघा एक महिना संसार केला. वैचारिक मतभेदांमुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. जवळपास २५ महिने वेगळे राहणाऱ्या या दाम्पत्याचा घटस्फोट कौटुंबीक न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. आराध्ये यांनी अवघ्या एक दिवसात मंजूर केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय - निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे १८ महिने वेगळे राहत असल्यास सहा महिन्यांचा कालावधी वगळता येतो. या प्रकरणात दोघे २५ महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

राहुल आणि प्रियांका (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. प्रियांकाच्या वतीने ॲड. अनिकेत भोसले, ॲड. शिल्पा टापरे आणि ॲड. तेजस वीर यांनी काम पाहिले. डिसेंबर २०२०मध्ये दोघांचे लग्न झाले. दोघेही पुण्यातीलच आहेत. एक महिना संसारानंतर जानेवारी २०२१पासून दोघे विभक्त राहू लागले. एप्रिल २०२२मध्ये पतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला. त्याला पत्नीचे वकील हजर राहिले. त्यानंतर दोन्ही पक्षात बोलणी झाली. परस्पर संमतीने अर्ज दाखल करण्याचे ठरले. त्यानुसार केलेला अर्ज न्यायालयाने एका दिवसात मंजूर केला.

दोघेही २५ महिन्यांपासून वेगळे राहत होते. समुपदेशन आणि झालेल्या बोलणीमध्ये ते एकत्र येणे शक्य नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दोघांना आणखी सहा महिने थांबविणे योग्य नव्हते. या परिस्थितीत न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे वेळेची बचत झाली आहे. आता दोघेही स्वतंत्रपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत.

- ॲड. शिल्पा टापरे, महिला अशिलाच्या वकील.

Web Title: A month's marriage and a day's divorce; The decision was taken due to ideological differences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.