भवानी पेठेत 2015 पासून पाकिस्तानी तरुणाचे वास्तव्य; बनावट कागदपत्राद्वारे पासपोर्टही मिळवला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 09:55 AM2023-03-15T09:55:49+5:302023-03-15T09:56:02+5:30
Pune Crime News : मोहम्मद अमान अन्सारी (वय 22) असे या तरुणाचे नाव आहे. खडक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.
पुणे : पुणे शहरातील खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भवानी पेठ 2015 पासून एका पाकिस्तानी तरुणाने बेकायदेशीर वास्तव्य केल्याचे उघडकीस आले आहे. भवानी पेठेतील चुडामन तालीम जवळ तो राहात होता अशी माहिती मिळाली आहे. मोहम्मद अमान अन्सारी (वय 22) असे या तरुणाचे नाव आहे. खडक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मोहम्मद अन्सारी हा 2015 पासून भवानी पेठेतील चुडामन तालीम जवळ बेकायदेशीररित्या राहत असल्याचे उघड झाले आहे. त्याने पुण्यात बनावट कागदपत्र तयार करून पासपोर्टही मिळवला आहे. या पासपोर्टच्या आधारे त्याने पुणे ते दुबई असा प्रवासही केला आहे. खडक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.