बारामतीच्या मार्केटयार्ड रस्त्यावर चालत्या कारने अचानक पेट घेतला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 07:25 PM2022-11-09T19:25:16+5:302022-11-09T19:54:14+5:30
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही
बारामती : बारामती शहरातील मार्केटयार्ड रस्त्यावर चालत्या कारने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. बुधवारी(दि ९) सायंकाळी हा प्रकार घडला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सायंकाळी सहाच्या सुमारास मार्केटयार्डच्या मागील प्रवेशद्वारापासुन काही अंतरावर हि चारचाकी गाडीने पेट घेतला .रस्त्यावरून जाताना कारने अचानक पेट घेतल्याने कारमध्ये असणारे चालक प्रसंगावधान राखून बाजूला गाडी घेत उतरले. शिवाय गाडीत इतर कोणी नसल्याने कोणतीही जीवीतहानी झालेली नाहि. मात्र, आग लागलेली पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. सुदैवाने नगरपरीषदेचे अग्नीशामक दलाचे वाहन वेळीच पोहचले. या वाहनाने आग वेळीच आटोक्यात आणली. मात्र, कारचे आगीत मोठे नुकसान झाले आहे.
या कारचे चालक वालचंदनगर(ता. इंदापुर)येथील असुन त्यांचे नाव दत्तात्रय जाधव असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. पोलीसांकडे देखील सायंकाळी उशीरा जाधव या प्रकरणी माहिती देण्यासाठी पोहचले होते. जाधव हे त्यांच्या कारमधुन बारामती येथील खासगी बालरुग्णालयात दाखल असलेल्या त्यांच्या नातेवाईकांच्या लहान मुलाला वालचंदनगर येथे नेण्यासाठी आले होते. दवाखान्याजवळ येतानाच कारने पेट घेतला. हिच घटना रुग्णालयातून लहान मुल आणि अन्य नातेवाईक घेऊन जाताना घडला असती ,तर मोठा अनर्थ घडण्याची भीती होती. मात्र, सुदैवाने वेळेआधीच आग लागल्याने पुढील अनर्थ टळल्याचे दत्तात्रय जाधव यांनी सांगितले. बारामतीत भिगवण चौकातून या भागात येतानाच गाडीचे ब्रेक निकामी झाल्याचे जाणवले.त्यामुळे त्याच परीस्थितीत गाडी बाजुला घेताना अचानक कारने पेट घेतला. प्रसंगावधान राखुन मी बाहेर पडलो. स्थानिकांनी मदत केली. तसेच अग्नीशामक दलाला कळवले. सुदैवाने वेळेआधीच आग लागली आणि त्यातून मी बाहेर प डल्याने पुढील अनर्थ टळला. नशीब बलवत्तर म्हणुन बचावल्याची प्रतिक्रिया जाधव यांनी व्यक्त केली.