आळंदीत लग्न सुरु असताना मांडवातून दागिन्यासह पर्स चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2023 20:38 IST2023-05-17T20:38:14+5:302023-05-17T20:38:46+5:30
सोन्याचे मोठे मंगळसुत्र, छोटे मंगळसुत्र, कानातली सोन्य़ाची फुले, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण ६७ हजार रुपयांचे नुकसान

आळंदीत लग्न सुरु असताना मांडवातून दागिन्यासह पर्स चोरीला
आळंदी : आळंदीतील लग्न मांडवात लग्नाचा विधी सुरु असताना एका महिलेच्या पर्समधून दागिन्यांची चोरी झाली. ही घटना १२ मे रोजी आळंदी येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात घडली. याप्रकरणी ४७ वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या लग्न मांडवात कन्यादानाचा विधी सुरु असताना स्टेजवरील खुर्चीत बसल्या होत्या. यावेळी त्यांनी त्यांची पर्स खुर्चीच्या खाली ठेवली. चोराने याच संधीचा फायदा घेत पर्स पळवली. या पर्समधील सोन्याचे मोठे मंगळसुत्र, छोटे मंगळसुत्र, कानातली सोन्य़ाची फुले, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण ६७ हजार रुपयांचा ऐवज चोरून गेला आहे. यावरून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.