‘सैराट’मधील सल्ल्याला पुण्यातील रिक्षाचालकाने लुबाडले

By प्रमोद सरवळे | Published: July 16, 2022 10:10 AM2022-07-16T10:10:49+5:302022-07-16T10:25:15+5:30

आरटीओनेही त्याची तत्काळ दखल घेत रिक्षाचालक असिफ मुल्ला यांचा शोध घेतला....

A rickshaw puller from Pune spoiled the advice in Sairat pune crime news | ‘सैराट’मधील सल्ल्याला पुण्यातील रिक्षाचालकाने लुबाडले

‘सैराट’मधील सल्ल्याला पुण्यातील रिक्षाचालकाने लुबाडले

Next

पुणे : ‘सैराट’मधील सल्ल्याच्या भूमिकेमुळे गाजलेल्या अरबाज शेख या कलाकाराला पुण्यातील रिक्षावाल्यांचा फटका बसला. ॲपद्वारे आरक्षित केलेल्या रिक्षाचालकाने ऐनवेळी जास्तीचे पैसे मागितले व देत नाही म्हटल्यावर धमकावून खाली उतरवून देण्याची धमकी दिली, असे शेख यांनी आरटीओकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

कामासाठी म्हणून पुण्यात आलेल्या शेख यांना नांदेड सिटीमधून पुणे स्टेशनवर जायचे होते. त्यांना त्यांच्या मित्राने मोबाईल ॲपवरून रिक्षा आरक्षित करून दिली. त्या रिक्षाने जात असताना ॲपवर दाखवत असलेल्या रस्त्याने न जाता रिक्षाचालक दुसऱ्याच रस्त्यावर रिक्षा फिरवत असल्याचे शेख यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली. त्यावर रिक्षाचालकाने आपल्याला शिवीगाळ केली व रिक्षातून खाली उतरवून देण्याची धमकी दिली. सहा वाजता स्टेशनवरून गाडी असल्याने जास्तीचे पैसे दिले व स्टेशनला उतरलो. शेख यांनी हा अनुभव समाजमाध्यमांवर टाकला तसेच आरटीओकडे लेखी तक्रारही केली.

आरटीओनेही त्याची तत्काळ दखल घेत रिक्षाचालक असिफ मुल्ला यांचा शोध घेतला. त्यांना नोटीस बजावली. या प्रकरणाबाबत रिक्षाच्या सर्व कागदपत्रांसह लेखी खुलासा सादर करण्याबाबत नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.

अरबाज शेखने त्याचा अनुभव फेसबुकवर पोस्ट केला. तसेच त्याने आरटीओकडे तक्रार दिली होती. यानंतर आरटीओने रिक्षाचालक आसिफ मुल्ला याच्याविरोधात नोटीस बजावली आहे. त्यात रिक्षाच्या सर्व कागदपत्रासंह ७ दिवसांत लेखी खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. शेख यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. पावसामुळे ॲपवर दाखवत असलेल्या रस्त्यावरून जाता येणे शक्य नव्हते. लांबून जायचे असल्याने जास्तीचे पैसे द्यावे लागतील, असे शेख यांना सांगितले असल्याची माहिती रिक्षाचालक मुल्ला याने दिली.

Web Title: A rickshaw puller from Pune spoiled the advice in Sairat pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.