शाळेच्या पहिल्या दिवशी घरी आल्यानंतर काळाची झडप; सायकल खेळताना गाडीखाली येऊन चिमुकल्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 17:14 IST2024-06-19T17:12:51+5:302024-06-19T17:14:27+5:30
शाळेचा पहिला दिवस असल्याने चिमुकला शाळेतून घरी परतल्यानंतर आनंदाने सायकल खेळत असतानाच त्याच्यावर काळाने झडप घातली

शाळेच्या पहिल्या दिवशी घरी आल्यानंतर काळाची झडप; सायकल खेळताना गाडीखाली येऊन चिमुकल्याचा मृत्यू
भिगवण : मोकळ्या मैदानावर सायकल खेळत असताना एका १० वर्षांच्या चिमुकल्याला चारचाकीखाली येऊन मृत्यू झाला. समर्थ सुशील शिंदे असे अपघातातमृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
भिगवण(ता. इंदापूर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर समर्थ हा सायकल खेळत होता. मंगळवार (दि,१८) रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास खेळत असताना हा अपघात झाला. मोकळया मैदानावर चारचाकी वळण घेत होती. त्यावेळी समर्थ मागून आला आणि त्या गाडीला धडकून खाली पडला. अगदी कमी वेळेतच चालकाला थांबवता न आल्याने गाडी थेट समर्थच्या अंगावरून गेली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी पुणे हलविले होते. परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी प्रेम मनोज भोसले (रा. भिगवण) असे चालकाचे नाव असून तो अपघात झाल्यानंतर फरार झाला.
शाळेच्या पहिल्या दिवशी घरी आल्यानंतर काळाची झडप; सायकल खेळताना गाडीखाली येऊन १० वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू#pune#bhigwan#cycle#Accidentpic.twitter.com/OUoRMOVA8Z
— Lokmat (@lokmat) June 19, 2024
मंगळवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने समर्थ हा शाळेतून घरी परतल्यानंतर आनंदाने सायकल घेवून खेळत असतानाच त्याच्यावर काळाने झडप घातली. समर्थ हा एकुलता एक असल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.