लग्नाचे आमिष दाखवून शाळकरी मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती ; तरुणाला अटक
By नम्रता फडणीस | Published: July 11, 2024 05:03 PM2024-07-11T17:03:13+5:302024-07-11T17:03:23+5:30
पंधरा वर्षाच्या शाळकरी अत्याचार केल्याने ती सात महिन्यांची गर्भवती राहिली
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने वेळोवेळी पंधरा वर्षाच्या शाळकरी मुलीवर बलात्कार केला. त्यातून ती सात महिन्यांची गर्भवती झाली. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकारणी तरुणाला भारती पोलिसांनी अटक केली.
शिवराज महेश गायकवाड (वय १९, रा. गुजरवाडी, कात्रज ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मुलगी आणि आरोपी गायकवाडची ओळख झाली होती. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती आरोपीला होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाच्या आमिषाने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर मुलगी गर्भवती झाली. याबाबतची माहिती तिच्या कुटुंबीयांना समजली. तेव्हा आरोपी गायकवाडने तिच्यावर लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचे उघडकीस आले. .
गायकवाडविरुद्ध बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड तपास करत आहेत.