जेजुरीत 'येळकोट येळकोट जय मल्हार' चा जयघोष; लाखो भाविक खंडेरायाच्या दर्शनाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 06:19 PM2023-05-28T18:19:02+5:302023-05-28T18:19:21+5:30

उन्हाळी सुट्ट्यांचे दिवस, मे महिन्यचा शेवटचा रविवार असल्याने जेजुरीत भाविकांची प्रचंड गर्दी

A shout of Yelkot Yelkot Jai Malhar in Jejuri Millions of devotees visit Khanderaya | जेजुरीत 'येळकोट येळकोट जय मल्हार' चा जयघोष; लाखो भाविक खंडेरायाच्या दर्शनाला

जेजुरीत 'येळकोट येळकोट जय मल्हार' चा जयघोष; लाखो भाविक खंडेरायाच्या दर्शनाला

googlenewsNext

जेजुरी : उन्हाळी सुट्ट्यांचे दिवस, मे महिन्याचा शेवटचा रविवार असल्याने आज जेजुरीत भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. सुमारे एक लाखांहून अधिक भाविकांनी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात, भंडार खोबऱ्याच्या उधळण करीत कुलदैवत खंडेरायाचे दर्शन घेतले. 

 सुगीचे दिवस सुरू होण्यापूर्वीचा तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीतील शेवटचा रविवार , लग्नसराई सुरू असल्याने राज्यभरातून आलेल्या भाविकांची जेजुरी गडावर मोठी गर्दी झाली होती. नेहमीप्रमाणे रविवारी होणाऱ्या गर्दीपेक्षा आज भाविकांची मोठी गर्दी जेजुरीत होती. रेल्वे, एस टी बस आणि खासगी वाहनाने भाविक जेजुरीत आले होते. मुख्य महाद्वार मार्ग, जुनी जेजुरी परिसर तसेच ऐतिहासिक चिंच बाग परिसरात भाविक उतरले होते. दुचाकी, चार चाकी वाहनांनी शहरातील सर्व रस्ते जाम झाले होते. दुपार नंतर वाहनांना जेजुरी शहरात प्रवेश करणे शक्य होत नव्हते. 

देव दर्शनाला आलेल्या भाविकांकडून ठीक ठिकाणी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी उरकले जात होते. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतुकीवर मोठा ताण येत होता. आळंदी पंढरपूर महामार्गावर वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक वारंवार खोळंबत होती. पोलीस प्रशासनाला वाहतुकीचे नियोजन करणे जिकिरीचे बनले होते.

Web Title: A shout of Yelkot Yelkot Jai Malhar in Jejuri Millions of devotees visit Khanderaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.