Pune: टिळक रस्त्यावर भरधाव कार घुसली थेट दुकानात; चालक अल्पवयीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:18 IST2025-01-13T13:17:43+5:302025-01-13T13:18:58+5:30
चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता का, अशी विचारणा पोलिसांना केली असता त्यांनी चालकाने मद्यप्राशन केले नसल्याचे सांगितले

Pune: टिळक रस्त्यावर भरधाव कार घुसली थेट दुकानात; चालक अल्पवयीन
पुणे : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट दुकानात शिरली. टिळक रोडवरील महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स दुकानात रविवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. क्रेन बोलावून कार बाहेर काढण्यात आली. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. शौकत कमलाकर बेळ (१९, हडपसर, काळेपडळ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, शौकत बेळ याचे रविवारी पहाटे तीनच्या सुमारास कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी फुटपाथवर चढली अन् महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक दुकानात शिरली. यात दुकानातील साहित्याचे नुकसान झाले. चालकासोबत त्याचे दोन मित्रदेखील गाडीत हाेते. चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता का, अशी विचारणा पोलिसांना केली असता त्यांनी चालकाने मद्यप्राशन केले नसल्याचे सांगितले.
टिळक रस्त्यावर भरधाव कार घुसली थेट दुकानात, चालक अल्पवयीन #Pune#tilakroad#Accidentpic.twitter.com/ocC6Oc9IjJ
— Lokmat (@lokmat) January 13, 2025
दरम्यान, सोशल मीडियावर अपघातानंतर एक मेसेज व्हायरल झाला. त्यामध्ये चालकाने कार भरधाव चालवून ती दुकानात घातली. नंतर परस्पर क्रेन चालकाला बोलावून दुकानातील कार काढत असताना नागरिकांनी संबंधित दुकानदाराला माहिती दिल्याचे मेसेजमध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.