Video: पुण्यात भरधाव चारचाकीची दूध विक्रेत्याला धडक; अपघातानंतर चालक फरार, मद्यप्राशन केले होते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:00 IST2025-03-17T11:57:17+5:302025-03-17T12:00:58+5:30

अपघातात झाल्यानंतर चार चाकी चालकाला थांबवण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून करण्यात आला मात्र त्याने तिथून पळ काढला

A speeding four wheeler hits a milk vendor in Pune The driver fled after the accident, was he drunk? | Video: पुण्यात भरधाव चारचाकीची दूध विक्रेत्याला धडक; अपघातानंतर चालक फरार, मद्यप्राशन केले होते?

Video: पुण्यात भरधाव चारचाकीची दूध विक्रेत्याला धडक; अपघातानंतर चालक फरार, मद्यप्राशन केले होते?

पुणे : पुण्यातील एन आय बी एम रस्त्यावर काल पहाटे भीषण अपघात घडला आहे. अपघातात दूध विक्रेत्याच्या दुचाकीचे सुद्धा मोठे नुकसान, झाले असून घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या एन आय बी एम रोड वर पहाटे ४ वाजता घडली. एका भरधाव चार चाकी चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि त्याने गाडी थेट त्या ठिकाणाहून जात असलेल्या दूध विक्रेत्याच्या गाडीवर घातली. या अपघातात दूध विक्रेत्याच्या गाडीचे मोठे नुकसान झाले तसेच मोठ्याप्रमाणावर दूध पण रस्त्यावर सांडले. अपघातात झाल्यानंतर चार चाकी चालकाला थांबवण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून करण्यात आला मात्र त्याने तिथून पळ काढला. याप्रकरणी आता संबंधित चालकावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चालकाने मद्य प्राशन केले होते का याचा देखील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: A speeding four wheeler hits a milk vendor in Pune The driver fled after the accident, was he drunk?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.