पुण्यातील कॅम्प परिसरात भरधाव मर्सडीजने २० ते २५ वाहनांना उडवले; एक युवक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 18:43 IST2024-04-26T18:43:24+5:302024-04-26T18:43:42+5:30
चालकाला फिट आल्याने सदरचा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे

पुण्यातील कॅम्प परिसरात भरधाव मर्सडीजने २० ते २५ वाहनांना उडवले; एक युवक गंभीर जखमी
लष्कर : पुण्याच्या कॅम्प भागातील एमजी रस्त्यावर एक धक्कादायक अपघाताची घटना घडली आहे. एका मर्सडिजने २० ते २५ वाहनांना उडवले आहे. त्यामध्ये एका युवकाच्या पायावरून गाडी गेल्याने त्याला पाय गमवावे लागले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिकची माहिती अशी की, दुपारी ३ च्या दरम्यान व्होलगा आयस्क्रीम चौकातून एक तरुण एम जी रोड कडे मर्सडिझने वेगाने येत होता. त्यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यात असणाऱ्या २० ते २५ दुचाकी वाहनांना उडवले. घटनास्थळी रॉयल फॅशन कपड्याच्या दुकानात मध्ये काम करणाऱ्या अनिस खत्री या तरुणाच्या दोन्ही पायावरून गाडी घातली. जखमी युवकाला ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चालकाला फिट आल्याने सदरचा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.