अंत्यविधी करून निघालेल्या लोकांमध्ये ट्रक घुसला, ३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी, नगर-कल्याण महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 12:45 PM2024-07-19T12:45:09+5:302024-07-19T12:47:42+5:30

नगरकडून येणारा भरधाव ट्रक अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या लोकांमध्ये शिरला यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला

A speeding truck rammed into a funeral on the Nagar Kalyan highway 3 people died many seriously injured | अंत्यविधी करून निघालेल्या लोकांमध्ये ट्रक घुसला, ३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी, नगर-कल्याण महामार्गावरील घटना

अंत्यविधी करून निघालेल्या लोकांमध्ये ट्रक घुसला, ३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी, नगर-कल्याण महामार्गावरील घटना

आळेफाटा : नगर-कल्याण महामार्गावर गुळंचवाडी (ता.जुन्नर) शिवारात भीषण अपघात झाला आहे. नगरकडून येणारा भरधाव ट्रक अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या लोकांमध्ये शिरला यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. हि घटना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

यावेळी ट्रकने महामार्गावर असलेल्या आठ ते दहा वाहनांना धडक दिली असून त्याचे मोठे नुकसान झाले आहे.  जखमींना आळेफाटा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांनी महामार्गावर आंदोलन सुरु केले आहे. अपघातात  मृत्यू व जखमींची सख्या वाढू शकते असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या आधिक माहितीनुसार, गुळुंचवाडी  गावातून भांबीरे यांचा अंत्यविधी करून गावातील अनेक नागरीक आणि नातेवाईक कल्याण-नगर रोडने जात होते. त्यावेळी नगर बाजूकडून येणाऱ्या ट्रकने अंत्यविधी करून पायी चालणाऱ्यांना उडवले. त्यामध्ये ३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक समोर आली आहे. या घटनेत ग्रामस्थांनी बराच वेळ महामार्ग रोखून धरला आहे. या ठिकाणी बायपास करावा या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे त्यांनी सांगितलं आहे. त्याठिकाणी त्याठिकाणी ग्रामस्थ आंदोलनाला बसले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.   

Web Title: A speeding truck rammed into a funeral on the Nagar Kalyan highway 3 people died many seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.