पुण्यात उकाड्यानंतर पावसाचा शिडकावा! जिल्ह्यात इंदापूर, बारामतीला जोरदार पाऊस
By श्रीकिशन काळे | Published: May 20, 2024 06:54 PM2024-05-20T18:54:21+5:302024-05-20T18:54:45+5:30
जिल्ह्यात इंदापूर, बारामती येथे मोठ्या ढगांची निर्मिती झाल्याने तिथे जोरदार पाऊस होत आहे....
पुणे : असह्य उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना सायंकाळनंतर झालेल्या वरूणराजाच्या शिडकाव्याने दिलासा मिळत आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागत आहे. जिल्ह्यात इंदापूर, बारामती येथे मोठ्या ढगांची निर्मिती झाल्याने तिथे जोरदार पाऊस होत आहे.
हवामान विभागाने सोमवारी सायंकाळी पुण्यासह नगर, छं. संभाजीनगर, सोलापूर, रत्नागिरी, सातारा, बुलढाणा, अमरावती, कोल्हापूर, अकोला, वाशिम, यवतमाळ आदी ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला होता. प्रचंड उष्णता झाल्यामुळे बाष्पीभवन होऊन बाष्प आकाशात जाते आणि त्यामुळे एकाच ठिकाणी क्यूम्यूलिनिम्बस प्रकारचे मोठे ढग तयार होतात. त्यातून कमी वेळेत अधिक पाऊस होतो. अशा प्रकारच्या ढगांची सध्या निर्मिती होत आहे.
पुण्यातील साडेपाच वाजेपर्यंतचा पाऊस
लवासा - १.५ मिमी
हवेली - १.० मिमी
कोरेगाव पार्क - ०.५ मिमी
ढमढेरे - ०.५ मिमी
पुण्यातील वानवडीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊसात मोठे नुकसान; झाडपडीच्या घटना, रस्ते झाले बंद#pune#rainpic.twitter.com/4Kj1TwlVmc
— Lokmat (@lokmat) May 20, 2024