कलाकारांच्या निखळ आनंदात दुर्गंधीचा अडसर; बालगंधर्व रंगमंदिराबाबत सुप्रिया सुळेंकडून खेद व्यक्त

By राजू हिंगे | Published: May 22, 2023 07:11 PM2023-05-22T19:11:37+5:302023-05-22T19:11:48+5:30

गेल्या काही वर्षांत बालगंधर्व रंगमंदिराच्या साफसफाई आणि स्वच्छतेबाबत प्रचंड उदासीनता

A stifling obstacle to the sheer joy of artists Regret from Supriya Sule regarding Balgandharva Rangmandir | कलाकारांच्या निखळ आनंदात दुर्गंधीचा अडसर; बालगंधर्व रंगमंदिराबाबत सुप्रिया सुळेंकडून खेद व्यक्त

कलाकारांच्या निखळ आनंदात दुर्गंधीचा अडसर; बालगंधर्व रंगमंदिराबाबत सुप्रिया सुळेंकडून खेद व्यक्त

googlenewsNext

पुणे: सांस्कृतिक राजधानी म्हणून नावलौकिक असणाऱ्या पुणे शहराचे 'बालगंधर्व रंगमंदिर ' हे सांस्कृतिक वैभव आहे. पुणेकरांचा हा मानबिंदू तसाच टापटीप आणि स्वच्छ रहायला हवा. कलाकार आणि रसिकांच्या निखळ आनंदात डास व दुर्गंधीचा अडसर असू नये याची दक्षता घ्यायला हवी, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. बालगंधर्वमधील दुर्गंधी आणि डासांच्या प्रदूर्भावावरूनही त्यांनी खेद व्यक्त केला आहे. 

बालगंधर्व रंगमंदिराची जबाबदारी असलेल्या पुणे पालिकेने योग्य ती निगा राखायला हवी, इतकेच नाही, तर त्याचा दैनंदिन आढावा सुद्धा घ्यायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत पुणे महापालिका आयुक्तांना टॅग करत त्यांनी ट्विट केले आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व स्व. पु. ल.देशपांडे यांनी आग्रहाने ही वास्तू पुण्यात उभा करवून घेतली होती. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी  तिचे उद्घाटन केले. हे रंगमंदिर अनेक अद्भुत कलाविष्कारांचे साक्षीदार आहे. म्हणूनच या वैभवाची जपणूक करणे ही समस्त पुणेकरांच्या वतीने महापालिकेची जबाबदारी आहे. परंतु गेल्या काही वर्षांत बालगंधर्व रंगमंदिराच्या साफसफाई आणि स्वच्छतेबाबत प्रचंड उदासीनता आहे. कलाकारांच्या ग्रीन रुम्सपर्यंत याचा फटका बसलेला आहे. मुख्य हॉलमध्ये देखील डासांचा प्रादुर्भाव झालेला आहे. याचा नाट्य रसिकांना प्रचंड त्रास होतो. स्वच्छता गृहाची तर अतिशय दयनीय अवस्था आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे. तसेच शहरातील इतरही रंगमंदिरांच्या साफसफाई व इतर आवश्यक गोष्टींचा दैनंदिन आढावा घेण्याची यंत्रणा सक्रीय करावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Web Title: A stifling obstacle to the sheer joy of artists Regret from Supriya Sule regarding Balgandharva Rangmandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.