कार नादुरुस्त असूनही जिद्दीने मिळवले यश; प्रथम क्रमांक पटकावून पुण्याची निकिता ठरली 'Fastest Driver'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 10:17 AM2022-12-02T10:17:51+5:302022-12-02T10:20:45+5:30

निकितीचा जागतिक स्तरावरील मोटर रॅलीमध्ये (डब्ल्यू.आर. सी.) मध्ये सहभागी होऊन भारताचे नाव जगाच्या नकाशात कोरण्याचा संकल्प

A stubborn success despite the car malfunction Pune Nikita maximum to get the first trophy.. | कार नादुरुस्त असूनही जिद्दीने मिळवले यश; प्रथम क्रमांक पटकावून पुण्याची निकिता ठरली 'Fastest Driver'

कार नादुरुस्त असूनही जिद्दीने मिळवले यश; प्रथम क्रमांक पटकावून पुण्याची निकिता ठरली 'Fastest Driver'

Next

हडपसर : इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिप  2022 वेस्ट झोन क्वालिफाईड राऊंड पुणे नानोली येथे पार पडला. या रॅलीमध्ये फास्टर ड्रायव्हर सह चार ट्रॉफी मिळविण्यात पुण्याच्या निकिता टकले - खडसरेला यश आले आहे. कार नादुरुस्त होऊनही जिद्दीने स्पर्धेत यश मिळविल्याने निकिताचे अभिनंदन होत आहे. 

 26 व 27 नोव्हेंबर रोजी पुण्यातील नानोली गावामध्ये दोन दिवसीय इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये भारताच्या वेस्ट झोन व बेंगलोर, हैदराबादसह 50 ते 60 कार रायडर सहभागी झाले होते. स्पर्धेत नवख्या निकिता टकले खडसरेने पहिल्याच दिवशी फास्टर ड्रायव्हर या गटात पहिली ट्रॉफी पटकावली. या ट्रॉफीसह विविध राउंड मध्ये आणखी तीन ट्रॉफी मिळविल्याने तिचे कौतुक होत आहे. एफएमएससीआय च्या आयोजकांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरीत करण्यात आली.

दुसरा दिवस मात्र निकितासाठी खूप खडतर होता. कारण पहिल्या दिवशीच्या राऊंडनंतर गाडी बंद पडल्याने व स्पर्धा खेडेगावात असल्याने त्या ठिकाणी गाडीचे पार्ट व मेकॅनिक उपलब्ध न झाल्याने स्पर्धेत पुन्हा सहभागी होण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु नाउमेद न होता इतर गाड्यांचे पार्ट टाकून कार सुरू केली. परंतु गाडी दुरुस्त झाली नाही तरी. पुन्हा सहभागी होत निकिताने एक ट्रॉफी पटकावली. पहिल्या दिवशी फास्टर ड्रायव्हरसह तीन ट्रॉफी पटकविल्या. निकिताच्या या यशाचे श्रेय ती वडील उद्योजक नितीन टकले, पती शुभम खडसरे, कुटुंबीय व तिचे मार्गदर्शक चेतन शिवराम यांना देते.
 
''दोन ते पाच डिसेंबर रोजी इंडियन नॅशनल चॅम्पियनशिप (के 1000) आयोजित केली आहे. यामध्ये निकिता टकले सहभागी होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन पहिली ट्रॉफी जिंकण्याचा मानस तिने बोलताना व्यक्त केला. राष्ट्रीय स्तरावर सहभागी होत यश मिळवीत असताना मुख्य लक्ष जागतिक स्तरावरील मोटर रॅलीमध्ये (डब्ल्यू.आर. सी.) मध्ये सहभागी होऊन भारताचे नाव जगाच्या नकाशात कोरण्याचा संकल्प निकिता टकलेने प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.''

Web Title: A stubborn success despite the car malfunction Pune Nikita maximum to get the first trophy..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.