VIDEO | आळंदीत सुषमा अंधारेंची प्रतीकात्मक अंत्ययात्रा; काय आहे नेमकं प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 02:47 PM2022-12-14T14:47:38+5:302022-12-14T14:59:48+5:30

आळंदीत वारकरी संप्रदायाच्या वतीने सुषमा अंधारे यांचा निषेध

A symbolic funeral procession of Sushma Andahan in Alandi; What is the real issue | VIDEO | आळंदीत सुषमा अंधारेंची प्रतीकात्मक अंत्ययात्रा; काय आहे नेमकं प्रकरण?

VIDEO | आळंदीत सुषमा अंधारेंची प्रतीकात्मक अंत्ययात्रा; काय आहे नेमकं प्रकरण?

googlenewsNext

- भानुदास पऱ्हाड

आळंदी (पुणे) : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायातील आणि संत मांदियाळीतील थोर संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आणि एकनाथ महाराज यांच्यावर सहेतूक विकृत टीकात्मक विडंबन केले होते. तसेच त्यांनी उपास्य दैवत प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण भगवंत यांच्यावर देखील टीका केली आहे. समाजात संत आणि देवतांची विडंबन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आळंदीतील साईबाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. महेश महाराज मडके पाटील यांनी आळंदी पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे. 

दरम्यान आळंदीत मंगळवारी (दि. १३) साईबाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणापासून आळंदी पोलिस ठाण्यापर्यंत सुषमा अंधारे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आळंदीत वारकऱ्यांकडून निषेध करण्यात आला. तसेच ''सुषमा अंधारे ज्या पक्षात असेल त्या पक्षाला मतदान करणार नाही'' अशी शपथ ठिकठिकाणी वारकऱ्यांनी घेतली आहे.

महाराष्ट्राला शेकडो वर्षांची वारकरी परंपरा ही केवळ संतांच्या विचाराची सेवा आहे. शिवसेना उपनेत्या अंधारे यांच्या वक्तव्यामुळे संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. भागवत धर्माची उभारणी करणाऱ्या संतांचे असे विकृत टीकात्मक विडंबन करणे निषेधार्ह आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Web Title: A symbolic funeral procession of Sushma Andahan in Alandi; What is the real issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.