जामिनावर सुटलेल्या शिक्षकाचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; प्राचार्य, ट्रस्टींसह ७ जण गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 01:51 PM2024-08-25T13:51:32+5:302024-08-25T13:51:40+5:30

निगडीतील प्रकार.

A teacher released on bail sexually assaults a student | जामिनावर सुटलेल्या शिक्षकाचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; प्राचार्य, ट्रस्टींसह ७ जण गजाआड

जामिनावर सुटलेल्या शिक्षकाचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; प्राचार्य, ट्रस्टींसह ७ जण गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी (पुणे) : सहा वर्षांपूर्वी शाळेतील मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या क्रीडा शिक्षकाने पुन्हा त्याच शाळेतील १२ वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचे उघड झाले. निगडी येथील शाळेत २०२२ ते २१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत हा धक्कादायक प्रकार घडला. या शिक्षकासह प्राचार्य, ट्रस्टचा अध्यक्ष आणि इतरांनाही पोलिसांनी अटक केली. निवृत्ती काळभोर हा क्रीडा शिक्षक पीडित मुलीशी अश्लील चाळे करीत असे. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला मार देईन, अशी धमकी देत असे. २१ ऑगस्ट रोजी ती स्वच्छतागृहातून बाहेर येत असताना त्याने पुन्हा अश्लील वर्तन केले. घरी सांगितल्यानंतर नातेवाईकांनी पोलिस स्टेशन गाठले.

पुन्हा तसेच 'प्रताप' शाळेतीलच अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी काळभोर विरोधात २०१८ मध्ये पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊन न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. अपिलात उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने पुन्हा नोकरीत सामावून घेतले. हे लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांना प्रोत्साहन दिल्यासारखे आहे. त्यामुळे काळभोर याच्यासह प्राचार्य, ट्रस्टचे अध्यक्ष यांच्यावरही गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

क्रीडा शिक्षकाचा प्रताप अंगलट

निवृत्ती देवराम काळभोर (५६, रा. गुरुद्वारा चौक, चिंचवड) या क्रीडा शिक्षकासह शाळेचे प्राचार्य अशोक सोपान जाधव (५३, रा. प्राधिकरण चिखली) यांना न्यायालयाने २९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास बलभीम जाधव (६३, रा. पिंपळे गुरव), अविंद अंकुश निकम (३६), गोरख सोपान जाधव (५०, दोघे चिखली), हनुमंत दादा निकम (६५, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) आणि शुभांगी अशोक जाधव (५०) यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्यासह लक्ष्मण नामदेव हेंद्रे याच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: A teacher released on bail sexually assaults a student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे