कल्याण नगर महामार्गावर म्हशी घेऊन जाणारा टेम्पो पलटी; ८ म्हशींचा जागीच मृत्यू, २ गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 01:18 PM2023-01-10T13:18:12+5:302023-01-10T13:19:03+5:30

दोन म्हशी गंभीर जखमी असून चालकासह दोघे जण जखमी

A tempo carrying a buffalo overturned on the Kalyan Nagar highway; 8 buffaloes died on the spot | कल्याण नगर महामार्गावर म्हशी घेऊन जाणारा टेम्पो पलटी; ८ म्हशींचा जागीच मृत्यू, २ गंभीर जखमी

कल्याण नगर महामार्गावर म्हशी घेऊन जाणारा टेम्पो पलटी; ८ म्हशींचा जागीच मृत्यू, २ गंभीर जखमी

googlenewsNext

पिंपरी पेंढार : कल्याण नगर महामार्गावर पिंपरी पेंढार (ता.जुन्नर) परिसरात म्हशी घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाला आहे. अपघातात आठ म्हशींचा मृत्यू झाला असून दोन म्हशी गंभीर जखमी आहेत. तर चालकासह दोघेजण जखमी झाली आहेत. ही घटना मंगळवार (दि 10) रोजी पहाटे साडेपाच वाजता घडली. 
  
मुंबई येथून कल्याण नगर महामार्गाने म्हशी घेऊन जाणारा टेम्पो पिंपरी पेंढार परिसरातील साईनगर येथील वळणदार ठिकाणी आला असता चालकाचा टेंम्पोवरील ताबा सुटल्याने तो रस्ताचे लगत असलेल्या खड्यात जाऊन पलटी झाला. या दुर्घटनेत टेम्पोत भरलेल्या १० म्हशींपैकी ८ म्हशी जागीच मृत्यू झाला तर चालक व आणखी एकजण जखमी झाल्याची माहिती ओतुर पोलीस सूत्रांनी दिली आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही जखमींना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 
          
अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्ता तळपाडे, संदीप भोते, शाम जायभाय, अमोल पालवे घटनास्थळी हजर झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश खिल्लारी व डॉ. कैलास लुधरकर यांनी म्हशींची तपासणी करून ८ म्हशी मृत असल्याचे घोषित केले. तर दोन गंभीर झाल्या याबाबत अधिकचा तपास ओतूर पोलीस करत आहेत.

Web Title: A tempo carrying a buffalo overturned on the Kalyan Nagar highway; 8 buffaloes died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.