PMPML: महाराष्ट्र दिनी सुरू होणार धार्मिक व पर्यटन स्थळांची सफर घडवणारी पर्यटन बस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 07:52 PM2023-04-28T19:52:10+5:302023-04-28T19:52:25+5:30

बसेसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास ५ प्रवाशांच्या तिकीट दरामध्ये १०० टक्के सवलत

A tourist bus to travel to religious and tourist places will be started on Maharashtra Day | PMPML: महाराष्ट्र दिनी सुरू होणार धार्मिक व पर्यटन स्थळांची सफर घडवणारी पर्यटन बस

PMPML: महाराष्ट्र दिनी सुरू होणार धार्मिक व पर्यटन स्थळांची सफर घडवणारी पर्यटन बस

googlenewsNext

पुणे : पीएमपीएमएल मार्फत महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा (जेजूरी) आणि अष्टविनायक पैकी मयुरेश्वर (मोरगाव), चिंतामणी (थेऊर), महागणपती (रांजणगांव) तसेच पुणे, पिंपरी चिंचवड शहर व लगतच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील विविध धार्मिक स्थळे, तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी व पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी पर्यटन बस सेवा १ मे पासून सुरू होणार आहे.

दर आठवड्याच्या शनिवारी व रविवारी विविध कार्यालये, कॉलेज, शाळा, औद्योगिक क्षेत्रातील व आयटी क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकरदारांना साप्ताहिक सुटी असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद जास्त असतो. प्रवाशांचा प्रवास आरामदायी, सुलभ व माफक दरात होण्यासाठी पीएमपीच्या पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर व १६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून धार्मिक व पर्यटन स्थळांसाठी वातानुकूलित ई-बस प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी यासह सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनातर्फे देण्यात आली.

सवलत आणि बुकिंग कसे करणार...

बसेसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास ५ प्रवाशांच्या तिकीट दरामध्ये १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे. पीएमपीच्या डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी आणि मनपा भवन या पास केंद्रावर या बससेवेचे तिकिट बुकिंग करता येईल. दरम्यान ज्या दिवशी पर्यटन बसचे बुकिंग केले असेल त्या दिवशी त्या प्रवासासाठी राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत व सायंकाळी पोहोचल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत त्याच तिकिटावर अन्य पीएमपीच्या बसेसमधून प्रवास करता येणार आहे.

पर्यटन बसचा मार्ग व इतर माहिती खालीलप्रमाणे..

- पर्यटन बससेवा क्र. १

- मार्ग - हडपसर, मोरगाव, जेजूरी, सासवड, हडपसर. (१ हजार रुपये प्रतिव्यक्ती)

- पर्यटन बससेवा क्र. २

- मार्ग - हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर
मंदिर, कोंढणपूर मंदिर, हडपसर. (१ हजार रुपये प्रतिव्यक्ती)

- पर्यटन बससेवा क्र. ३

- मार्ग - डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कन. (१ हजार रुपये प्रतिव्यक्ती)

- पर्यटन बससेवा क्र. ४

- मार्ग - पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगांव धरण, पुणे स्टेशन. (१ हजार रुपये प्रतिव्यक्ती)

- पर्यटन बससेवा क्र. ५

- मार्ग - पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणेस्टेशन. (७०० रुपये प्रतिव्यक्ती)

- पर्यटन बससेवा क्र. ६

- मार्ग - पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई, छ. संभाजी महाराज समाधीमंदिर (वढू बुद्रुक),

रांजणगांव गणपती, पुणे स्टेशन. (१ हजार रुपये प्रतिव्यक्ती)

- पर्यटन बससेवा क्र. ७

- मार्ग - भक्ती शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसावी मंदिर (चिंचवड), प्रतिशिर्डी

(शिरगांव), देहूगांव, गाथा मंदिर, आळंदी, भक्ती शक्तीनिगडी. (७०० रुपये प्रतिव्यक्ती)

Web Title: A tourist bus to travel to religious and tourist places will be started on Maharashtra Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.