ट्रेकिंगसाठी लिंगाणा किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकाचा ४०० फूट खोल दरीत पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 08:56 AM2023-03-28T08:56:43+5:302023-03-28T08:59:05+5:30

या किल्ल्यावर जाण्यासाठी वेल्हे तालुक्यातून मार्ग आहे...

A tourist who went to Lingana fort for trekking fell into a 400 feet deep gorge and died | ट्रेकिंगसाठी लिंगाणा किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकाचा ४०० फूट खोल दरीत पडून मृत्यू

ट्रेकिंगसाठी लिंगाणा किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकाचा ४०० फूट खोल दरीत पडून मृत्यू

googlenewsNext

पुणे : लिंगाणा किल्ल्यावरती ट्रेकिंग करण्यासाठी आलेल्या मुंबई येथील ग्रुपमधील पर्यटक खोल दरीत पडल्याची घटना घडली. अजय काळे (वय वर्ष ६२) असे या पर्यटकाचे नाव आहे. खोलदरीत पडल्याने काळे यांचा मृत्यू झाला. किल्ले लिंगाणा हा रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असला तरी या किल्ल्यावर जाण्यासाठी वेल्हे तालुक्यातून मार्ग आहे.

स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल येथील एक ट्रेकरचा ग्रुप ट्रेकिंगसाठी येथे आला असता यातील अनुभवी ट्रेकर्स असणारे अजय काळे हे ट्रेकिंग दरम्यान चक्कर येऊन खोल दरीत कोसळले. दरी जवळपास ४०० फूट खोल त्याने त्यांना शोधण्यात उशीर केला आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: A tourist who went to Lingana fort for trekking fell into a 400 feet deep gorge and died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.