पुणे-नगर रोडवर डॉक्टर दांपत्याच्या कारला ट्रकची धडक; पत्नी जागीच ठार, पतीवर उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 12:44 PM2023-02-15T12:44:56+5:302023-02-15T12:48:10+5:30

अपघातानंतर त्यांना उपचारांसाठी शिक्रापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले...

A truck hit the car of a doctor couple on the Pune-Nagar road; Wife died on the spot, husband is under treatment | पुणे-नगर रोडवर डॉक्टर दांपत्याच्या कारला ट्रकची धडक; पत्नी जागीच ठार, पतीवर उपचार सुरू

पुणे-नगर रोडवर डॉक्टर दांपत्याच्या कारला ट्रकची धडक; पत्नी जागीच ठार, पतीवर उपचार सुरू

googlenewsNext

शिक्रापूर (पुणे) : शिक्रापूर (ता. शिरुर) येथे पुणे-नगर महामार्गावर डॉक्टर दांपत्याच्या कारला ट्रकची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात डॉ. सोनाली मच्छिंद्र खैरे यांचा जागीच मृत्यू झाला तर डॉ. मच्छिंद्र नारायण खैरे हे गंभीर जखमी झाले असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पवन भगवान साठे या ट्रकचालकावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर येथील खैरे हॉस्पिटलचे संचालक डॉ. मच्छिंद्र खैरे व डॉ. सोनाली खैरे हे दोघे आज १५ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या (एम एच १२ एच एन ३६५३) कारमधून पुणे-नगर महामार्गावरील साई सहारा पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी गेले होते. पेट्रोल भरुन परत येत असताना रस्ता ओलांडण्यासाठी पुणे बाजूकडे येत असताना अहमदनगर बाजूने वेगाने आलेल्या (एम एच १२ क्यू जि ७४४७) या ट्रकची खैरे यांच्या कारला जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. त्यामध्ये कारचा पुढील निम्मा भाग आतमध्ये गेला. यावेळी कारच्या डाव्या बाजूला बसलेल्या डॉ. सोनाली मच्छिंद्र खैरे (वय ३७ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला तर डॉ. मच्छिंद्र नारायण खैरे हे गंभीररित्या जखमी झाले. 

अपघातानंतर त्यांना उपचारांसाठी शिक्रापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेबाबत डॉ. कैलास बाळासाहेब बांदल यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी पवन भगवान साठे (वय २५ वर्षे रा. किनी ता. जळगाव जि. बुलढाणा) याचे विरुद्ध गुन्हे दाखल केला आहे.

Web Title: A truck hit the car of a doctor couple on the Pune-Nagar road; Wife died on the spot, husband is under treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.