बलिदान दिनानिमित्त ज्योत घेऊन निघालेल्यांना ट्रकची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 12:03 PM2024-04-09T12:03:45+5:302024-04-09T12:03:59+5:30

अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी झाले...

A truck hit those carrying Jyot on the occasion of Sacrifice Day; One dead, three injured | बलिदान दिनानिमित्त ज्योत घेऊन निघालेल्यांना ट्रकची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

बलिदान दिनानिमित्त ज्योत घेऊन निघालेल्यांना ट्रकची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त ज्योत घेऊन निघालेल्या युवकांना भरधाव ट्रकने धडक दिल्याची घटना केसनंद-थेऊर रस्त्यावर घडली. अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी झाले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अथर्व संतोष हेंद्रे (१८, रा. श्रीनाथ अपार्टमेंट, बुधवार पेठ, फलटण, जि. सातारा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात अनिकेत सुनील जगदाळे, प्रेम पोळ आणि विवेक ताराळकर (तिघे रा. फलटण) हे जखमी झाले. याप्रकरणी ट्रकचालक संतोष शिवाजी नरळे (रा. बंडगर वस्ती, हबिसेवाडी, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आदित्य शंकरराव गायकवाड (३१, रा. तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा) याने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण येथील शिवप्रतिष्ठान संघटनेचे कार्यकर्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त शुक्रवारी मध्यरात्री वढू येथून ज्योत घेऊन फलटणकडे निघाले होते. ७० ते ८० कार्यकर्ते सहभागी झाले होते. केसनंद-थेऊन रस्त्यावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वार तरुणांच्या गटाला धडक दिली. अपघातात अथर्वच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अनिकेत जगदाळे, प्रेम पोळ आणि विवेक ताराळकर जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवशांत खोसे करत आहेत.

Web Title: A truck hit those carrying Jyot on the occasion of Sacrifice Day; One dead, three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.