पुण्यात पुन्हा दहशत; टपरीवरच्या पैशाच्या वादातून कोयता घेऊन घरात घुसण्याचा प्रयत्न, व्हिडिओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 16:44 IST2025-03-17T16:43:01+5:302025-03-17T16:44:35+5:30
भारती विद्यापीठ येथील त्रिमुर्ती चौकात चहाच्या टपरीवर भांडणे झाली होती, चहाच्या टपरीवर चहा पिल्यानंतर पैशाच्या कारणावरून कोयत्याने धाक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला

पुण्यात पुन्हा दहशत; टपरीवरच्या पैशाच्या वादातून कोयता घेऊन घरात घुसण्याचा प्रयत्न, व्हिडिओ आला समोर
धनकवडी : पुण्यात गुन्हेगारी कमी होणायचे काही चिन्हे दिसत नाहीत. खून, मारामाऱ्या, वाहनांची तोडफोड, महिलांवरील अत्याचार या घटना दिवसेंदिअव्स वाढतच चालल्या आहेत. मध्यंतरी कोयता गँगच्या दहशतीने पुणेकरणामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता पुन्हा एकदा कोयता गँगची दहशतीचा एका व्हिडिओ समोर आला आहे. पुण्यातील दत्तनगर आंबेगाव परिसरातील एका घरा जवळ काही तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन उभे असलेला व्हिडिओ आज सकाळपासून समाज माध्यमावर फिरत असून या प्रकरणाची आंबेगावपोलिसांनी गंभीर दखल घेत चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात पुन्हा दहशत; टपरीवरच्या पैशाच्या वादातून कोयता घेऊन घरात घुसण्याचा प्रयत्न, व्हिडिओ आला समोर#Pune#katraj#police#crimepic.twitter.com/xFkKfUhjRN
— Lokmat (@lokmat) March 17, 2025
आंबेगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.१७) सकाळी सात वाजता भारती विद्यापीठ येथील त्रिमुर्ती चौकात चहाच्या टपरीवर भांडणे झाली होती. चहाच्या टपरीवर चहा पिल्यानंतर आरोपींनी पैसे का दिले नाहीत या कारणावरून हटकल्याने त्या व्यक्तीच्या घरात जाऊन तिघाजणांकडून कोयत्याने धाक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान त्यातील एक जण दत्तनगर येथील आपल्या घरी निघून गेला होता. त्याला शोधण्यासाठी बाकीचे मित्र त्याच्या घराजवळ गेले, यावेळी त्यांच्या मधील एकाचा हातात धारदार शस्त्र असल्याचे दिसून आले.