पैशासाठी पत्नीचा सौदा, ३ हजार रुपयांसाठी केले मित्रांच्या हवाली; पुण्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 11:39 AM2023-04-04T11:39:56+5:302023-04-04T11:42:41+5:30

फिर्यादी महिला रास्ता पेठ परिसरातून जात असताना तिच्या पतीच्या मित्रांनी तिचा रस्ता अडवला...

A wife's bargain for money; Handed over to friends for 3 thousand rupees; Shocking types in Pune | पैशासाठी पत्नीचा सौदा, ३ हजार रुपयांसाठी केले मित्रांच्या हवाली; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पैशासाठी पत्नीचा सौदा, ३ हजार रुपयांसाठी केले मित्रांच्या हवाली; पुण्यातील धक्कादायक प्रकार

googlenewsNext

- किरण शिंदे

पुणे :पुणे शहरातील हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैशाच्या लोभापाई पतीनेच पत्नीला वाममार्गाला लावत जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. इतकेच नाही तर अवघ्या तीन हजार रुपयात पतीने पत्नीला चक्क मित्रांच्या हवाली केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. २५ वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार पतीसह त्याच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेच्या पतीला पैशाची आवश्यकता होती. त्यामुळे पैशाची गरज भागवण्यासाठी त्याने फिर्यादीला मारहाण करत उंड्री हांडेवाडी रस्त्यावर उभे करून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. आरोपीने आपल्याच दोन मित्रांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेत स्वतःच्या पत्नीला त्यांच्या ताब्यात सोपवले. पत्नीची इच्छा नसतानाही मित्रांसोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. डिसेंबर 2020 पासून हा संपूर्ण प्रकार सुरू होता. 

दरम्यान काही दिवसांपूर्वी फिर्यादी महिला रास्ता पेठ परिसरातून जात असताना तिच्या पतीच्या मित्रांनी तिचा रस्ता अडवला. तिला जातीवाचक शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त देसाई करत आहेत.

Web Title: A wife's bargain for money; Handed over to friends for 3 thousand rupees; Shocking types in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.