ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मजूर महिलेने गमावला जीव; सोळाव्या मजल्यावरून पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 10:04 AM2022-07-22T10:04:55+5:302022-07-22T10:05:05+5:30

सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने बांधकाम ठेकेदाराच्या विरोधात दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल

A woman laborer lost her life due to negligence of the contractor Death after falling from the sixteenth floor | ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मजूर महिलेने गमावला जीव; सोळाव्या मजल्यावरून पडून मृत्यू

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मजूर महिलेने गमावला जीव; सोळाव्या मजल्यावरून पडून मृत्यू

Next

पुणे: नियोजित गृहप्रकल्पातील सोळाव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील जयदेवनगर परिसरात घडली. सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने बांधकाम ठेकेदाराच्या विरोधात दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मीनाकुमारी साहू (वय ४१) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजूर महिलेचे नाव आहे. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदार पवार शंकर भाई रेड्डी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राणी शिंदे यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

साहू मूळची छत्तीसगडमधील आहे. सिंहगड रस्त्यावरील जयदेवनगर परिसरात नियोजित गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. सोळाव्या मजल्यावर फरशी बसविण्याचे काम सुरू होते. त्या वेळी तोल गेल्याने साहू सोळाव्या मजल्यावरून इमारतीच्या आवारातील डक्टमध्ये पडल्या. गंभीर जखमी झालेल्या साहूचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. चौकशीत ठेकेदाराने सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या प्रकरणी ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read in English

Web Title: A woman laborer lost her life due to negligence of the contractor Death after falling from the sixteenth floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.